मुंबई :कॉंग्रेस नेते राहूल गांधी ( Rahul Gandhi ) यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या गेल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. मात्र, यात कुठलेही तथ्य़ नसून राहूल गांधी यांच्या या्त्रेमुळे घाबरलेल्या भाजपने व्हिडिओत छेडछाड करून खोटा प्रचार सुरू केला असल्याचा आरोप, कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे ( Atul Londhe criticized on BJP ) यांनी केला आहे.
Atul Londhe on BJP : पाकिस्तान जिंदाबाद घोषणेच्या व्हिडिओत सत्यता नाही - अतुल लोंढे - भयग्रस्त भाजपाचा खोटारडेपाणा
कॉंग्रेस नेते राहूल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान काही ठिकाणी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या गेल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे. मात्र, या व्हिडिओत काडीमात्र सत्य नाही. हा व्हिडिओ छेडछाड करून बनवला गेला आहे. अशा पद्धतीची घटना कुठेही घडली नाही. मात्र केवळ कॉंग्रेस आणि राहूल गांधी ( Rahul Gandhi ) यांना बदनाम करण्यासाठी भाजपाच्या अमित मालवीय या आयटी सेलच्या कार्यकर्त्याने हा उद्योग केला असल्याचा, आरोप कॉंग्रेसचे मुख्य़ प्रवक्ते अतुल लोंढे ( Atul Londhe criticized on BJP ) यांनी केला आहे.
व्हायरल व्हिडीओत सत्यता नाही - कॉंग्रेस नेते राहूल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान काही ठिकाणी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या गेल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे. मात्र, या व्हिडिओत काडीमात्र सत्य नाही. हा व्हिडिओ छेडछाड करून बनवला गेला आहे. अशा पद्धतीची घटना कुठेही घडली नाही. मात्र केवळ कॉंग्रेस आणि राहूल गांधी यांना बदनाम करण्यासाठी भाजपाच्या अमित मालवीय या आयटी सेलच्या कार्यकर्त्याने हा उद्योग केला असल्याचा, आरोप कॉंग्रेसचे मुख्य़ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.
भाजपच्या वतीने खोटा प्रचार - राहूल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला मिळत असलेला प्रतिसाद, तसेच राज्यातील विविध प्रश्नांबाबत त्यांच्याकडे लोक मांडत असलेल्या व्यथा पाहून भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच भाजप आपल्या नेहमीच्या हीन पातळीवर उतरले असून असा खोटा प्रचार केला जात आहे. पण जनता यांना माफ करणार नाही, असेही लोंढे यानी म्हटले.