मुंबई- लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्या ठाकरे यांच्या उपस्थितीत चतुर्वेदी यांनी प्रवेश केला.
काँग्रेस प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदींचा शिवसेनेत प्रवेश - congress
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्या ठाकरे यांच्या उपस्थितीत चतुर्वेदी यांनी प्रवेश केला.
प्रियांका चतुर्वेदी
माझे आणि महाराष्ट्राचे नाते फार जवळचे आहे कारण माझे लहानपण याच मुंबईत गेले आहे. तसेच या राज्यासारखे राज्य कुठेच नसल्याचे प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या.
मला महिला आणि माझ्या आवडीनुसार काम करायचे आहे. ते मला शिवसेना सारख्या संघटनेत करायला मिळेल म्हणून मी शिवसेना पक्षात प्रवेश केला असल्याचेही चतुर्वेदी यांनी सांगितले.