मुंबई - सुशांतसिंह प्रकरणात खरेतर भाजपाचे तोंड काळे झाले आहे, मात्र तोंड काळे झाले असले तरी आपले हात किती स्वच्छ आहेत, असा कांगावा भाजपा करत आहे. सर्वांच्या चौकशीची मागणी करत फिरणाऱ्या भाजपाच्या ड्रग्ज कनेक्शनची एनसीबी कधी चौकशी करणार आहे? असा प्रश्न काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे.
भाजपाच्या ड्रग कनेक्शनची एनसीबी कधी करणार चौकशी? काँग्रेसचा सवाल - सचिन सावंत भाजपा टीका
भाजपाकडून नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना एक पत्र देण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर सावंत यांनी भाजपावर जोरदार हल्ला चढवला आहे. भाजपाने पत्र देऊन निर्लज्जपणा केल्याचे सावंत यांचे म्हणणे आहे.
भाजपाकडून नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना एक पत्र देण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर सावंत यांनी भाजपावर जोरदार हल्ला चढवला आहे. भाजपाकडून देण्यात आलेले हे पत्र म्हणजे 'गिरे तो भी टांग ऊपर' अशा पद्धतीचे आहे. महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या भाजपाकडे एवढा निर्लज्जपणा कसा आहे, याचे आश्चर्य वाटते. तोंड काळे झाले तरी हात किती स्वच्छ आहेत, असे दाखवण्याचा हा प्रकार आहे. सुशांतसिंह प्रकरणाचा आणि एनसीबी चौकशीचा काही संबंध नाही हे आता पूर्णपणे स्पष्ट झालेले आहे, असे सावंत यांनी सांगितले.
भाजपा सत्ताधाऱ्यांचे बॉलिवूड कनेक्शन जोडत आहे. निर्माता संदीप सिंहसोबत मोदींच्या बायोपिकचे पोस्टर रिलीज करताना त्यांचा नव्हता का बॉलिवूडशी संबंध?असे सावंत म्हणाले. भाजपाने सुशांतसिंह प्रकरणाच्या माध्यमातून महाराष्ट्राची बदनामी केली. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता त्यांना आठवणीत ठेवल्याशिवाय राहणार नाही, असेही सावंत म्हणाले.