मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी सकाळी दिलेल्या निर्णयानंतर महाविकासआघाडीचे सरकार 162 नव्हे, तर 170 चा बहुमत सिद्ध करणार, असा विश्वास शिवसेना नेते एकनाथ शिंदेंसह सर्व आमदारांनी व्यक्त केला.
सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक असा निर्णय दिला असून लोकशाहीत सत्याचा विजय झाला आहे. ज्यांच्याकडे बहुमत आहे त्या पक्षाचा सन्मान झाला आहे. उद्या सभागृहात महाविकासआघाडीच्या बाजूने १६२ नाहीतर १७० आमदार आपल्याला दिसतील. तर, ज्यांनी अल्पमतांमध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे, त्यांनी तत्काळ राजीनामा देवून लोकशाही आणि बहुमताचा सम्मान केला पाहिजे, असे शिवसेना नेते एकनाथ शिंदे ईटीव्ही भारतशी बोलताना म्हणाले.
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक म्हणाले, जास्तीत जास्त बहुमत सिद्ध करून उद्या आमचे सरकार सत्तेवर येईल, तर ज्या रात्रीच्या अंधारात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा सम्मान करत आपला राजीनामा द्यावा.
हेही वाचा - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया, शिवसेनेला केले 'असे' आवाहन...