मुंबई- काँग्रेसची चौथी यादी जाहीर झाली आहे. यात 19 उमेदवारांचा समावेश आहे. यात रामटेकसाठी उदयसिंह यादव, गोंदियामधून अमर वराडे, चंद्रपूरमधून महेश मेंधे तसेच हादगावमधून माधवराव पवार यांना काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाली आहे.
काँग्रेसच्या 19 उमेदवारांची चौथी यादी जाहीर; मुख्यमंत्र्यांविरोधात आशिष देशमुख रिंगणात - विधानसभा निवडणूक
काँग्रेसच्या 19 उमेदवारांची ही यादी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांविरोधात काँग्रेसने आशिष देशमुख यांना उमेदवारी दिली आहे.
काँग्रेस
हेही वाचा -पवार साहेबांनी काय केलं हे 'उपऱ्यां'नी विचारू नये; मोदी-शाहांवर कोल्हेंचा निशाणा
काँग्रेसच्या 19 उमेदवारांची ही यादी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांविरोधात काँग्रेसने आशिष देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. तसेच सिल्लोडमधून कैझर आझाद यांना उमेदवारी दिली आहे. तर, नंदुरबारमधूनही उमेदवारी बदलण्यात आली आहे. येथून उदेसिंग पाडवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.