मुंबई - केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या सुरू असलेल्या दिल्ली चलो आंदोलनाचा आज आठवा दिवस होता आज शेतकऱ्यांच्या एका शिष्टमंडळ केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांची भेट घेतली. या आंदोलनाला राज्यातील काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. कृषी कायदा आणि केंद्रातील मोदी सरकारविरोधात आज काँग्रेसकडून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा; यवतमाळमध्ये धरणे आंदोलन
यवतमाळ -केंद्र सरकारने लादलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात दिल्ली येथे देशभरातील शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. आता शेतकरी मरतील पण कायदा रद्द केल्याशिवाय परत येणार नाही. अशी भूमिका घेतली आहे. या आंदोलनाला काँग्रेसने समर्थन दिले आहे. तसेच विदर्भातील पाच हजार शेतकरी या दिल्लीतील आंदोलनात सहभागी होणार आहेत. दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाला समर्थन म्हणून आता यवतमाळ येथील आझाद मैदानामध्ये काँग्रेसच्यावतीने केंद्र सरकारच्याविरोधात धरणे आंदोलन देण्यात आले.
कृषी कायद्याविरोधात काँग्रेसचे पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
पालघर- दिल्ली येथे नव्या कृषी कायद्याविरोधातील शेतकरी आंदोलन आणखी तीव्र होत आहे. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासासाठी देशासह राज्यात देखील अनेक ठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. पालघरमध्येही केंद्र सरकारने लागू केलेल्याा नव्या कृषी कायद्याविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जनता दल, माकप, कष्टकरी संघटना आदींसह जिल्ह्यातील विविध पक्ष, संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.
शेतकऱ्यांच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा; लातुरात सर्वपक्षीय नेते एकत्र
लातूर - कृषी कायद्यासह कामगार कायदा हा अन्यायकारक आहे. त्यामुळे देशभर आंदोलने केली जात आहेत. तर राजधानी दिल्ली येथे लाखोंच्या संख्येने शेतकरी एकवटले आहेत. या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आज लातूर येथील गांधी चौकात निदर्शने करण्यात आली.यावेळी काँग्रेसच्यावातीनेही पाठिंबा देण्यात आला आहे.