मुंबई- एनआरसीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाशी खोटे बोलले. त्यामुळे त्यांच्याबद्दलचा आदर कमी झाला आहे. म्हणून या मुद्द्यावर काँग्रेस पक्ष त्यांचा निषेध करत आहे, अशी भूमिका काँग्रेसचे प्रवक्ते सचिव सावंत यांनी मांडली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आज (मंगळवारी) मांडण्यात आली. यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
दिल्लीतील रामलीला मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 ते 2019 पर्यंत देशात एनआरसीच्या अंमलबजावणीबाबत काहीही ठरलेले नाही, असे वक्तव्य पंतप्रधान मोदी यांनी केले होते. मात्र, पंतप्रधानांचे हे वक्तव्य धादांत खोटे असल्याचे सचिन सावंत म्हणाले. सुधारित नागरिकत्व कायद्याच्या अंमलबजावणी नंतर एनआरसीची अंमलबजावणी देशभरात होईल, अशी भूमिका गृहमंत्री अमित शहा यांनी अनेकदा मांडली आहे. त्यासोबत संसदेत राष्ट्रपतीच्या अभिभाषणात देखील एनआरसीच्या अंमलबजावणी बाबत उल्लेख आहे. एवढेच नाही तर देशातील सर्व गृहमंत्री आणि पोलीस महासंचालक यांच्या बैठकीत अमित शहा यांनी आदर्श स्थानबद्धता केंद्र कसे असावे, याबाबत ड्राफ्ट तयार केला होता. त्यामुळे याबाबत पंतप्रधान मोदी यांनी मांडलेली भूमिका खोटी असल्याचे दिसून येत असल्याकडे काँग्रेस पक्षाने लक्ष वेधले.
हेही वाचा -मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या, मुख्यमंत्री ठाकरेंचे पंतप्रधानांना पत्र
स्थानबद्धता केंद्र राज्यात उभारण्याबाबतची परिस्थिती काय?