महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nana Patole News: मंत्रीमंडळ विस्तारात मंत्रीपदासाठी आता बोली लागणार काय? - नाना पटोले - Congress President Nana Patole

महाराष्ट्रात आपण हरतोय अस दिसताच काही पक्ष धार्मिक दंगली करू लागले आहे. दोन धर्मात तेढ निर्माण करत दंगली घडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या करावाई करण्याची मागणी नाना पटोले यांनी अतिरिक्त पोलिस महासंचालक संजय सक्सेना यांच्याकडे केली आहे.

Nana Patole
नाना पटोले

By

Published : May 19, 2023, 10:51 PM IST

माहिती देताना नाना पटोले

मुंबई: महाराष्ट्र कायद्याचे राज्य असून सामाजिक एकोपा जोपसण्यासाठी महाराष्ट्राचा लौकिक आहे. मात्र गेल्या काही दिवसातील घटना पहिल्या तर राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याच काम काही जण करत आहे. दोन धर्मात तेढ निर्माण करत दंगली घडवण्याचा प्रयत्न संस्था, संघटना करत आहे. अशा प्रकारच्या लोकांवर करावाई करण्याची मागणी नाना पटोले यांनी अतिरिक्त पोलिस महासंचालक संजय सक्सेना यांच्याकडे केली आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांच्या सह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नसीम खान, मुनाफ हकीम, देवानंद पवार, गजानन देसाई यांनी संजय सक्सेना यांची भेट घेतली.



पोलीस कोणत्या दबावाखाली काम करताय:राज्यातील ऐकतेला गालबोट लावण्याचे काम संभाजीनगर, अमरावती, अकोला, शेवगाव, अहमदनगर व त्र्यंबकेश्वरमध्ये जाणीवपूर्वक वातावरण खराब करण्याचे काम करणाऱ्या वरती कारवाई करा. अशा प्रकारात गुन्हे दाखल करण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचा आदेश असतानाही, गुन्हे दाखल केले जात नाही. पोलीस यंत्रणा कोणाच्या दबावाखाली काम करत आहे, असा प्रश्न पटोले यांनी उपस्थित केला. मुंबई-वडोदरा महामार्गासाठी जमीनिसाठी आदिवासी महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर कारवाई करा.



सगळ्यांनी संयम पाळावा: राज्यात दररोज ७० मुली बेपत्ता होत आहे. जानेवारी ते मार्च २०२३ या तीन महिन्यात ५५१० मुली बेपत्ता झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र राज्यातील सत्ताधारी केरळ स्टोरी मध्ये सगळे मग्न आहेत. खारघर मधील घटना बाबत आयोजकांवर अद्याप गुन्हा का दाखल झाला नाही ?कोकणातला निसर्ग संपवण्याचे काम लोकांना उध्वस्त करण्याच काम सरकारकडून सुरू आहे. महाराष्ट्रात आपण हरतोय अस दिसताच काही पक्ष धार्मिक दंगली करू लागले आहे. जाती आणि धार्मिक दंगली राज्यात होऊ नयेत, अशी काँग्रेसची भूमिका आहे. लोकांनी संयम पाळवा असा आम्ही आवाहन करत असल्याचेही यावेळी पटोले यांनी सांगितले.



शेतकऱ्यांना हे सरकार न्याय देणार नाही: राज्याचे मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्यास समजते. मंत्रीपदासाठी आता बोली लागल्याचे देखील बोलले जात आहे. जसे 40 टक्के कमिशन कर्नाटक मध्ये होते. तसे कमिशन घेऊनच मंत्री बनविले जाणार आहे का? आम्ही जे ऐकतोय नड्डा यांच्या कार्यलयातून फोन येऊन त्या प्रकारची बोलीचाली झाल्याचे ऐकतो आहे. एक मंत्री सात जिल्ह्यात काम करत आहे. अवकाळी पावसाळ्याने शेतकरी हैराण आहे. शेतकऱ्यांना हे सरकार न्याय देणार नाही.


हेही वाचा -

  1. Nana Patole Criticized BJP राज्यात माणुसकीचे रक्तपात करण्याचे काम सुरू अकोला दंगलीवरून नाना पटोले यांची भाजपवर टीका
  2. Nana Patole Akola Visit माझ्या मृत आईला परत आणून द्या हो त्या मुलाची पटोलेंकडे मागणी
  3. Uday Samant on Nana Patole महाविकास आघाडीचे नेतृत्व नाना पटोले करणार का उदय सामंतांचा खोचक टोला

ABOUT THE AUTHOR

...view details