महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

''कॅब'साठी पक्षाने भूमिका मांडली आहे, मात्र केंद्रीय नेतृत्व निर्णय घेईल' - Citizenship Amendment Bill latest news

राज्यात पाच जिल्हा परिषदेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. त्यासंदर्भात काँग्रेसकडून टिळक भवन येथे प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

balasaheb thorat
बाळासाहेब थोरात

By

Published : Dec 13, 2019, 4:34 PM IST

मुंबई- राष्ट्रीय नागरिकत्व सुधारणा (कॅब) विधेयकाला आमचा पूर्वीपासूनच विरोध आहे. हे विधेयक मुळातच संविधान विरोधी आहे. यासाठी आमच्या पक्षाने या विधेयकाच्या विरोधात भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे राज्यात हे लागू करायचे की नाही, यासाठीचा निर्णय आमचे केंद्रीय नेतृत्व घेईल, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज मुंबईत दिली.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात

हेही वाचा -पुण्यातील गहुंजे बलात्कार प्रकरण : राज्य महिला आयोग सर्वोच्च न्यायालयात

राज्यात पाच जिल्हा परिषदेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. त्यासंदर्भात काँग्रेसकडून टिळक भवन येथे प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आज महाराष्ट्रात ज्या पाच जिल्हा परिषदेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत, त्यासंदर्भात संबंधित जिल्हा परिषदेतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे. यात आमचे जिल्हा परिषदेची पार्लमेंट्री बोर्ड असून, त्या माध्यमातून आम्ही ही बैठक बोलवावी आहे. यात आम्हाला उमेदवारांची निवड करायची आहे, म्हणून जिल्हा अध्यक्ष यांना या बैठकीस बोलावले असल्याची माहिती थोरात यांनी दिली.

या निवडणुकीमध्ये आम्ही काँग्रेसने शिवसेनेसोबत जायचे की नाही, यासाठीची चर्चा आज करणार आहोत. तसेच जिल्ह्यात कशी परिस्थिती आहे, त्यासाठी आघाडी करायची की नाही, यावरही यात चर्चा केली जाणार असल्याचे थोरात यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details