मुंबई -कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएसचे सरकार हे लोकशाही मार्गाने निवडून आलेले आहे. पण ज्या राज्यात विरोधी पक्षांची सत्ता आहे, ते सरकार अस्थिर करण्याचा डावच भाजप सरकारने आखला आहे. आता कर्नाटकचे सरकार पाडून भाजपचे सरकार स्थापन करण्याचा भाजपचा कुटील डाव असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
विरोधी पक्षांचे सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा कुटील डाव - काँग्रेस - shivkumar
कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएसचे सरकार हे लोकशाही मार्गाने निवडून आलेले आहे. पण विरोधी पक्षांची सरकारे अस्थिर करण्याचा डावच भाजप सरकारने आखला आहे.
काँग्रेसचा भाजपवर निशाणा
याआधीही भाजपने गोवा व मणिपूरमध्ये असेच षडयंत्र केले होते. भाजप लोकशाहीची क्रूर चेष्ठा करत असल्याचेही काँग्रेसने म्हटले आहे. ज्या हॉटेलमध्ये शिवकुमार यांनी स्वतःसाठी खोली आरक्षित केली होती. पण पोलिसांनी त्यांना त्या हॉटेलमध्येही जाऊ दिले नाही. स्वपक्षाच्या आमदारांना भेटण्यात गैर काय आहे? असेही काँग्रेसने म्हटले आहे.