मुंबई - राज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेवरून सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात मतभेद सुरू झाले आहेत. आता त्यात विद्यार्थी संघटनांनीही उडी घेतली आहे. काँग्रेसच्या एनएसयूआय या विद्यार्थी संघटनेने राज्यपालांच्या भूमिकेवरच आक्षेप घेत त्यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून हटवून त्यांच्या ठिकाणी दुसरी नेमणूक करावी, अशी मागणी करणारे पत्र राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे आज पाठवले आहे.
राज्यपाल आहेत की विरोधी पक्षनेते? एनएसयुआयची राष्ट्रपतींकडे राज्यपालांना हटवण्याची मागणी - राज्यपालांना हटविण्याची एनएसयुआयची मागणी
राज्यात राज्यपालांच्या विरोधात विद्यार्थ्यांचा आक्रोश उफाळून येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना त्वरित हटवून त्यांच्या ठिकाणी नवीन राज्यपालांची नेमणूक करावी, अशी मागणी काँग्रेसच्या एनएसयूआय या विद्यार्थी संघटनेने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे एक पत्र लिहून केली असल्याची माहिती शेख यांनी दिली.
काँग्रेसच्या एनएसयुआयने राज्यपालांना हटवण्याची केली राष्ट्रपतीकडे मागणी
एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष अमीर शेख यांनी यासाठी राज्यभरात #GoBackKoshyari असे हशटॅग वापरून सोशल माध्यमावर एक मोहीम उघडली आहे. या मोहिमेला राज्यभरातून विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. राज्यातील विद्यार्थ्यांचे हित लक्षात न घेता राज्यपाल आपली भूमिका बजावत आहेत, परंतु ही भूमिका विरोधी पक्षनेत्यासारखी असल्याचे शेख यांनी यावेळी सांगितले.