मुंबई - काँग्रेस-राष्ट्रवादीचा जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. काँग्रेस २४, राष्ट्रवादी २० तर मित्रपक्षांना ४ जागा देण्यात आल्या आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मुंबईत ही घोषणा केली. यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील गैरहजर होते.
यावेळी अशोक चव्हाणांनी केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधला. भाजप आणि शिवसेना हे धर्मांध पक्ष आहेत. त्यांना जनता धडा शिकवल्याशिवाय रहणार नाही असे चव्हाण म्हणाले. भाजप आणि इतर पक्षांकडून फोडाफोडीचे राजकारण केले जातं असल्याचाही आरोप अशोक चव्हाण यांनी केला.
कोणत्या पक्षाला किती जागा
काँग्रेस - २४
राष्ट्रवादी- २०
स्वाभिमानी शेतकरी संगटना - २
बहुजन विकास आघाडी - १
युवा स्वाभिमानी - १
जयंत पाटील
- महाराष्ट्रातील हे सरकार उलथून टाकण्यासाठी आम्ही सर्व एकत्र आलो असल्याचे जयंत पाटील म्हणाले.
- जनतेला पुन्हा एकदा चांगले दिवस आणण्यासाठी आम्ही ही महाआघाडी एकत्र आणली आले.
- शेतकरी, शेतमजूर, मध्यमवर्ग, दुष्काळला समोरे जाणारी जनता आदी मुद्द्यांवर एकमत केले आहे.
- राज्यातील जनता आम्हाला पाठींबा देईल असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.
राजू शेट्टी
- केंद्र आणि राज्य सरकारने सर्वच घटकांचा विश्वासघात केला असल्याचे वक्तव्य खासदार राजू शेट्टी यांनी केले. भाजपने जनतेला भूल भुलैय्या दाखवला आहे.
अजित पवार
भाजप आणि शिवसेनेसारख्या जातीयवादी पक्षांना बाजूला ठेवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने तयारी केली होती. मित्र पक्षांना १० जागा देण्याची तयारी केली होती. काही लोकांनी ( वंचित आघाडी) हेतू पुरस्सर आघाडी केली नाही. ते लोक भाजपची बी टीम आहे की काय अशी शंका यायला लागली असल्याचे अजित पवार म्हणाले.