महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शरद पवार आपल्यासोबत ठामपणे, चिंता करण्याचे कारण नाही - उद्धव ठाकरे - congress NCP and shivsena are together

आरएसएस आपल्याला पुन्हा संपर्क करत असून आता खुप उशीर झाला असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. शरद पवार आपल्यासोबत ठामपणे उभे आहेत, त्यामुळे चिंता करायची गरज नाही, असा दिलासाही त्यांनी आमदारांना दिला.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे

By

Published : Nov 24, 2019, 8:28 PM IST

मुंबई -शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज 'द ललित' हॉटेलमध्ये आमदारांची भेट घेतली. त्यांनी सद्या सुरू असलेल्या राजकिय घडामोडींबद्दल शिवसेना आमदारांना माहिती दिली. यावेळी, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे तिन्ही पक्ष एकत्र मिळून लढत आहोत, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी आमदारांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा -महाविकास आघाडीकडे 165 आमदारांचे संख्याबळ - संजय राऊत

आरएसएस आपल्याला पुन्हा संपर्क करत असून आता खुप उशीर झाला असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. शरद पवार आपल्यासोबत ठामपणे उभे आहेत, त्यामुळे चिंता करायची गरज नाही, असा दिलासाही त्यांनी आमदारांना दिला. शिवसेना आमदार व नेत्यांच्या या बैठकीत पुढील रणनीती आखली जाणार आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details