महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

MLA Bhai Jagtap on BMC : एअर प्युरिफायर म्हणजे जनतेच्या पैशाचा अपव्यय; कॉंग्रेस आमदार भाई जगतापांची पालिकेच्या निर्णयावर टीका - Congress MLA Bhai Jagtap critics on BMC

एअर प्युरिफायर लावून मुंबईला कोणताही फायदा होणार नसल्याने जनतेच्या पैशाचा पूर्णपणे अपव्यय आहे, अशी टीका आमदार भाई जगताप यांनी केली आहे. मुंबई महानगर पालिकेने मुंबईत एअर प्युरिफायर बसवण्याच्या निर्णयावर त्यांनी पत्रकार परिषदेत टीका केली.

MLA Bhai Jagtap Critics
आमदार भाई जगताप

By

Published : Feb 12, 2023, 6:14 PM IST

आमदार भाई जगताप पत्रकार परिषदेत बोलताना

मुंबई : मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण आहे तसेच शहरात सर्वत्र बांधकाम सुरु असल्याने हवेची गुणवत्ता सातत्याने ढासळत आहे. यावर उपाय म्हणून मुंबई महापालिकेने एअर प्युरिफायर बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जाणार आहेत. मात्र हे एअर प्युरिफायर लावून मुंबईला कोणताही फायदा होणार नसल्याने जनतेच्या पैशाचा पूर्णपणे अपव्यय आहे अशी टीका करण्यात आली आहे. तर मुंबईमधील प्रदूषण थांबवायचे असेल तारा संपूर्ण मुंबईमध्ये एअर प्युरिफायर लावण्याची मागणी केली जात आहे.

मुंबईत एअर प्युरिफायर : मुंबई शहर हे देशाची आर्थिक राजधानी आहे. गेल्या काही वर्षात देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी असलेली मुंबई ही दोन्ही शहरे प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक होऊ लागली आहेत. मुंबईमध्ये भाजपा आणि शिवसेना युतीचे सरकार असताना काही ठिकाणी एअर प्युरिफायर लावण्यात आले होते. या एअर प्युरिफायरमुळे प्रदूषण कमी होत नसल्याने ते प्युरिफायर नंतर काढण्यात आले होते. आता पुन्हा एकदा मुंबई महापालिकेने मुंबईत कोट्यवधी रुपये खर्च करून दहिसर टोल नाका, मुलुंड चेकनाका, अमर महाल जंक्शन, वरळी जंक्शन, कलानगर या पाच ठिकाणी एअर प्युरिफायर लावण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असे प्युरिफायर लावावे अशा सूचना पालिका आयुक्ताना अर्थसंकल्पा आधी केल्या होत्या. त्यानुसार हे प्युरिफायर लावण्यात येणार असल्याची माहिती, पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिली आहे.

पूर्णपणे पैशाचा अपव्यय : मुंबई महापालिका एअर प्युरिफायर लावणार या आहे. एअर प्युरिफायर म्हणजे जनतेच्या पैशाचा पूर्णपणे अपव्यय आहे. एअर प्युरिफायर टॉवर्सऐवजी सरकारने प्रदूषणाचे स्रोत ओळखणे आणि त्यांचे अधिक चांगले आयोजन करणे, प्रदूषण नियंत्रण नियमांचे पालन केले जाईल याची खात्री करणे या उपाययोजना करणे गरजेचे आहे. हे टॉवर्स म्हणजे जी समस्या वरवर सोडवता येत नाही, अशा समस्येचे वरवरचे उत्तर आहे, अशी टीका माजी पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

एअर प्युरिफायर स्प्रिंकलर्स सर्वत्र लावा : एअर प्युरिफायर लावण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या ठिकाणी ट्रॅफिक होते त्याठिकाणी एअर प्युरिफायर आणि स्प्रिंकलर्स लावणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मुंबईमध्ये असा कोणता रस्ता आहे ज्या ठिकाणी सिग्नलवर बॉटल नेक नाही. २५ कोटीत असे किती प्युरिफायर लावून प्रदूषण कमी होणार आहे का. किती प्रमाणात प्रदूषण कमी होईल. ज्यांनी कोणी हे सुचवले आहे त्याचे आश्चर्य वाटते. प्रदूषणावर कायमस्वरूपी आणि थोड्या कालावधीसाठी अश्या दोन प्रकारच्या उपाययोजना राबवणे गरजेचे आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी एअर प्युरिफायर आणि स्प्रिंकलर्स सर्वत्र लावले पाहिजेत, अशी मागणी काँग्रेसचे आमदार आणि मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी केली आहे.

एअर प्युरिफायर : मुंबईतील वायू प्रदुषणाची समस्या लक्षात घेतल्यास शहरातील दहिसर टोल नाका, मुलुंड चेकनाका, अमर महाल जंक्शन, वरळी जंक्शन, कलानगर या पाच ठिकाणी एअर प्युरिफायर बसवण्यात येणार आहेत. प्रदुषण नियंत्रणासाठी एअर प्युरिफायर टॉवर लावण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यानुसार अर्थसंकल्पात याबाबतची तरतूद प्रस्तावित आहे. मुंबईतील प्रदुषण नियंत्रण आणि नियंत्रित राहण्यासाठी दिल्ली, गुडगाव, लखनऊप्रमाणे एअर प्युरीफायर टॉवर मुंबई महानगरात देखील बसविण्याचे नियोजन आहे.


हेही वाचा :Aditya Thackeray Letter To Chahal : आमदार आदित्य ठाकरेंचे आयुक्तांना पत्र! ठेकेदारांची अनामत रक्कम रोखण्याची मागणी

ABOUT THE AUTHOR

...view details