महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

काँग्रेसच्या बैठकीत मंत्री, आमदारांना 'सीएए'-'एनआरसी'चे धडे.. - विजय वडेट्टीवार बातमी

भाजपकडून देशभरात आणि राज्यातही सीएए, एनआरसी, एनपीआर संदर्भात मोठ्या प्रमाणात गैरसमज पसरवण्यात येत आहे. त्याविरोधात कायदेशीर बाबी आणि त्यासाठी पक्षाची एकुणच भूमिका काय असावी यासाठी आज काँग्रेसच्या मंत्री आणि आमदारांची विधानभवनात बैठक पार पडली.

vijay wadettiwar
vijay wadettiwar

By

Published : Feb 11, 2020, 4:49 PM IST

मुंबई- अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसच्या मंत्री आणि आमदारांची विधानभवनात बैठक पार पडली. या बैठकीत मंत्री आणि आमदारांना प्रामुख्याने सीएए, एनआरसी या विषयांवर देशभरातून बोलावण्यात आलेल्या तज्ज्ञांकडून धडे देण्यात आले. यात सीएए, एनआरसी विरोधात आयएएस पदाचा राजीनामा दिलेले माजी गोपीनाथ कन्नन यांचाही समावेश होता.

काँग्रेसच्या बैठकीनंतर बोलतांना विजय वडेट्टीवार आणि पृथ्वीराज चव्हाण

हेही वाचा-काँग्रेसने मागील निवडणुकांमधून काहीच धडा घेतला नाही, जगदीश शर्मांचा पक्षाला घरचा आहेर..

भाजपकडून देशभरात आणि राज्यातही सीएए, एनआरसी, एनपीआर संदर्भात मोठ्या प्रमाणात गैरसमज पसरवण्यात येत आहे. त्याविरोधात कायदेशीर बाबी आणि त्यासाठी पक्षाची एकुणच भूमिका काय असावी यावर या बैठकीत चर्चा झाली. यात आमदारांकडून काही प्रश्नोत्तरे झाली, तर अनेक बाबी नव्याने आमदारांना सांगण्यात आल्याची माहिती मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

दिल्लीतील जनता धार्मिक राजकारणाला बळी पडली नाही
दिल्ली विधानसभेच्या निकालावर प्रतिक्रिया देताना वडेट्टीवार म्हणाले की, दिल्लीचा निकाल जनतेला असाच अपेक्षित होता. या निवडणुकीत भाजपने धार्मिक मतांचे ध्रुवीकरण करण्याची भूमिका मांडली होती. त्यासाठी समाजात द्वेष पसरवून धार्मिक मतांवर आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दिल्लीती जनतेने त्यांना चपराक दिली. दिल्लीच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या भाषणात विकासाचा लवलेशही दिसला नाही. त्यामुळे दिल्लीतील जनता धार्मिक राजकारणाला बळी पडली नाही.

आपात्कालीन पासपोर्ट देऊन 'तीला' बाहेर काढले जाईल

आजची ही बैठक प्राथमिक स्वरूपाची होती. त्यात तांत्रिक महिती असावी यासाठी एक विशेषज्ञांची एक टीम बोलावली होती. अश्विनी पाटील ही राज्यातील मुलगी चीनमध्ये अडकली आहे. तिच्याशी मी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून बोललो आहे. चीनमधील राजदुतांशीही संपर्क केला. त्यांनी सांगितले की आम्ही संपर्कात आहेत. आपात्कालीन पारपत्र देऊन तिला बाहेर काढले जाईल, अशी माहिती दूतावासाकडून देण्यात आली असल्याचे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details