मुंबई - काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांचे स्वागत करण्यासाठी आज (गुरुवारी) टिळक भवन येथे काँग्रेसच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. त्या बैठकीत काँग्रेसच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. बैठकीला सुरुवात होण्यापूर्वी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी आणि सरदार वल्लभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून बैठक सुरू करण्यात आली.
टिळक भवन येथे काँग्रेसच्या बैठकीला सुरुवात; नवनिर्वाचित आमदारांचे स्वागत - tilak bhawan mumbai congress meeting
काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांचे स्वागत करण्यासाठी आज (गुरुवारी) टिळक भवन येथे काँग्रेसच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. त्या बैठकीत काँग्रेसच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.
हेही वाचा -पोटदुखीचा त्रास होऊ लागल्यानं धनंजय मुंडे रुग्णालयात भर्ती, काळजीचे कारण नाही
बैठकीत काँग्रेसकडून आज (गुरुवारी) विधीमंडळ पक्षनेत्याची निवड केली जाणार नाही. केंद्रीय निरीक्षक आणि त्यांचे सदस्य आल्यानंतर त्यासाठीचा निर्णय घेतला जाणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे. बैठकीला काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जून खर्गे यांच्यासह प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माजी, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आदी वरिष्ठ नेते उपस्थित आहेत.