मुंबई :यावेळीपुणे शहरात दिवसा एका तरुणीवर कोयत्याने हल्ला केला जातो. महिला आणि मुलींवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले. महिलांसाठी सुरक्षित असलेले महाराष्ट्र आणि मुंबई शहर शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात उत्तर प्रदेश, बिहारसारखे जंगलराज झाले असल्याची जनतेची भावना समोर येतात आहे, अशी टीका कॉंग्रेसकडून करण्यात आली.
काँग्रेस रस्त्यावर उतरणार :कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर सरकार गंभीर नसून काँग्रेस पक्ष मात्र गंभीर आहे. या परिस्थितीबाबत काँग्रेसने राज्यपाल व पोलीस महासंचालक यांची भेट घेऊन परिस्थितीची माहिती दिली होती. मात्र, कोणतीही सुधारणा झाली नसल्यामुळे वेळप्रसंगी काँग्रेस पक्ष कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरणार, अशा इशारा कॉंग्रेस पक्षाने दिला.
काँग्रेस बळी पडणार नाही :लोकसभा मतदारसंघ निहाय 15 ते 20 जागा संदर्भात चर्चा झाली; मात्र पूर्ण चर्चा झाली नाही. 6 जुलैला पुढची बैठक होणार आहे. सध्या काही जागांवर साधक-बाधक चर्चा सुरू आहे. महविकास आघाडीसोबत आम्ही चर्चा करत आहोत. वज्रमूठ सभांना थोडा वेळ झाला आहे. हे आम्ही नाकारत नसल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. संभाजी भिडे यांच्यावर विचारलेल्या प्रश्नावर काही बोललं पाहिजे असं वाटतं नसल्याचं त्यांनी म्हटले आहे. सध्या ध्रुवीकरण करण्याचे काम सुरू आहे. लोकांची दिशाभूल करायची सुरुवात असून हा भाजपचा हा डाव आहे. त्यामुळे अशा कोणत्याही गोष्टींवर काँग्रेस बळी पडणार नाही.