मुंबई - पितृपक्ष संपल्यानंतर आज नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी काँग्रेसकडून राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या पहिल्या यादीत ५१ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यात माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना भोकर मधून तर विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना संगमनेर येथून आणि विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांना ब्रह्मपूरी येथून उमेदवारी देण्यात आली आहे.
पहिल्या यादीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर, काँग्रेसचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री नितीन राऊत, प्रणीति शिंदे, विश्वजीत कदम, अमित देशमुख या दिग्गज नेत्यांसह इतर उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
अशोक चव्हाण हे नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदारसंघातून, बाळासाहेब थोरात संगमनेरमधून, विजय वडेट्टीवार ब्रह्मपुरीमधून नितीन राऊत नागपूर उत्तरमधून, प्रणीति शिंदे सोलापूर मध्यमधून, विश्वजीत कदम पलूस कडेगावमधून तर अमित देशमुख हे लातूर शहरातून विधानसभेसाठी रिंगणात उतरणार आहेत. यांच्यासह इतर उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
मुंबईत धारावी या राखीव मतदारसंघातून वर्षा गायकवाड यांना तर चेंबूर मधून माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर चांदीवलीतून काँग्रेसचे नेते नसीम खान यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना या पहिल्या उमेदवारी यादीत स्थान देण्यात आले आहे. यात विधिमंडळ गटनेते अॅड. केसी पडवी, वीरेंद्र जगताप, यशोमती ठाकूर, रंजीत कांबळे अमर काळे, डॉ. नितीन राऊत, डी. पी. सावंत, संतोष टारफे, डॉ. कल्याण काळे, अमीन पटेल, अशोक जगताप, संग्राम थोपटे, रमेश बागवे, अशोक शिवाजीराव पाटील-निलंगेकर, बसवराज पाटील डॉ. विश्वजीत पाटील या पहिल्या यादीत समावेश आहे. अनेक विद्यमान आमदारांसह माजी आमदारांना ही संधी देण्यात आले आहे.
काँग्रेसच्या ५१ उमेदवारांची पहिली यादी काँग्रेसच्या ५१ उमेदवारांची पहिली यादी पहिल्या यादीतच दिली १७ नवीन चेहऱ्यांना संधी
काँग्रेसने आज जाहीर केलेल्या पहिल्या 51 उमेदवारांच्या यादीत तब्बल १७ नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. यात काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार असलेले सुरेश धानोकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना वरोरा विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. नवापूरमधुन काँग्रेसचे माजी स्वरूपसिंग यांच्या जागी त्यांच पुत्र शिरीश यांना यावेळी संधी दिली आहे. चिमूरमधून मागच्या वेळी अविनाश मनोहर वरजूरकर यांना काँग्रेसने तिकीट दिले होते. यावेळी त्यांचे बंधू सतीश यांना नशीब आजमावण्याची काँग्रेसने संधी दिली आहे.
नवीन चेहऱ्यांमध्ये काँग्रेसने नवापूर (सुरेश नाईक), मेहकर (अनंत वानखेडे), चिमुर (सतीश वारजूरकर), वरोरा (प्रतिभा धानोरकर), यवतमाळ (अनिल मंगरूळकर), भोकर (अशोक चव्हाण), अंबरनाथ (रोहित साळवे), मीरा भाईंदर (सय्यद मुजफ्फर हुसेन), भांडुप पश्चिम (सुरेश कोपरकर), वांद्रे पूर्व (झिशान सिद्दिकी), सायन कोळीवाडा (गणेश जाधव), कुलाबा (भाई अशोक जगताप), निलंगा (अशोक पाटील- निलंगेकर), सोलापूर दक्षिण (मौलाबी बसहूमिया सय्यद), कोल्हापूर दक्षिण (ऋतुराज पाटील), करवीर (पी. एन. पाटील सडोलीकर) यांना उमेदवारी जाहीर केली आहे.