महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मोदी सरकारच्या दबावामुळे काँग्रेस नेत्यांचे ट्विटर अकाऊंट बंद, नाना पटोलेंचा आरोप - मोदी सरकारवर टीका

काँग्रेस नेते राहुल गांधींसह अनेक काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांचे ट्विटर अकाऊंट बंद करण्यात आले आहे. त्यावरून काँग्रेस नेते मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत. 'ट्विटरवर मोदी सरकारचा दबाव आहे. भाजप नेत्यांचे ट्विट का बंद होत नाहीत?', असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

nana
nana

By

Published : Aug 12, 2021, 6:55 PM IST

Updated : Aug 12, 2021, 8:02 PM IST

मुंबई -अनेककाँग्रेस (congress) नेते आणि कार्येकर्त्यांचे ट्विटर अकाऊंट बंद करण्याची कारवाई ट्विटरने केली आहे. यावरून महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Maharashtra Congress State President Nana Patole) यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

'ट्विटरवर मोदी सरकारचा दबाव'

'काँग्रेस सातत्याने सामान्य लोकांचा आवाज उठवत आहे. तो आवाज दाबण्यासाठी ट्विटरवर केंद्र सरकारने दबाव आणला आहे. त्यामुळेच काँग्रेसच्या नेत्यांचे ट्विटर अकाऊंट बंद करण्यात आले आहे', असा आरोप नाना पटोले (nana patole) यांनी केला आहे.

'जाब विचारून जेरीस आणल्याने मोदी सरकारचा ट्विटरवर दबाव'

'काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी (congress leader rahul gandhi) यांचे ट्विटर अकाऊंट बंद (twitter account closed) करण्यात आले. त्यानंतर अखिल भारतीय काँग्रेस पक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षासह देशभरातील काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे ट्विटर अकाऊंट बंद करण्यात आले आहे. ट्विटरची ही कारवाई पक्षपातीपणाची आहे. केंद्रातील मोदी सरकारला जाब विचारणारे ट्विट करून जेरीस आणल्यामुळेच मोदी सरकारच्या दबावाखाली ट्विटरने ही कारवाई केली आहे. या कारवाईचा काँग्रेस पक्ष निषेध करत आहे. कोणत्याही दबावापुढे न झुकता लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेस पक्ष आवाज उठवतच राहिल', असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

'भाजप नेत्यांचे ट्विटर अकाऊंट का बंद होत नाहीत?'

'केंद्रातील मोदी सरकार लोकशाही व्यवस्था व संविधानाला न जुमानत हुकूमशाही (Dictatorship) पद्धतीने कारभार करत आहे. केंद्र सरकारच्या विरोधातील प्रत्येक आवाज दडपण्याचा प्रयत्न मागील ७ वर्षापासून सातत्याने केला जात आहे. संविधानाने आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. अन्याय, अत्याचार दिसेल त्याविरोधात आम्ही आवाज उठवत आलो आहोत. यापुढेही आवाज उठवत राहू. काँग्रेस पक्ष मोदी सरकारच्या अन्यायी कारभाराचे वाभाडे काढत आहे. तेच त्यांना अडचणीचे ठरल्याने कारवाई केली आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते वारंवार समाजात तेढ निर्माण करणारे, फुट पाडणारे, देशविघातक संदेश ट्विटरवरून देत असतात. मात्र, त्यांच्यावर कारवाई करण्याची हिम्मत ट्विटर करत नाही. पण थातुरमातूर कारणे देऊन काँग्रेसच्या शेकडो ट्विटर खात्यांवर कारवाई करण्यात आली हा पक्षपातीपणा आहे', असेही नाना पटोलेंनी म्हटले आहे.

'काँग्रेसला कोणीच रोखू शकत नाही'

'ट्टिवरने अखिल भारतीय काँग्रेस पक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्ष, मुंबई काँग्रेस, विधिमंडळ पक्षनेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी केंद्रीय मंत्री अजय माकन, जितेंद्र सिंह, महिला काँग्रेसच्या सुष्मिता देव, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, प्रदेश सरचिटणीस व सोशल मीडियाचे अभिजित सपकाळ यांच्यासह काँग्रेसची शेकडो खाती बंद केली आहेत. ट्विटरने कितीही खाती बंद केली तरी संविधानाने दिलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य व काँग्रेसचा विचार तळागळापर्यंत पोहोचवण्यापासून कोणीही रोखू करु शकत नाही', असेही पटोले म्हणाले.

हेही वाचा -हॅलो मी शरद पवार बोलतोय! शरद पवार यांच्या आवाजाची हुबेहुब नक्कल करून अधिकाऱ्याला गंडवण्याचा प्रयत्न

Last Updated : Aug 12, 2021, 8:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details