मुंबई - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून अनेक दिवस उलटले तरीही, राज्यात सत्तास्थापनेचा तिढा अद्याप कायम आहे. मात्र, आता हा तिढा सुटण्याची लक्षणे दिसू लागली आहेत. मुंबईत पार पडलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीचा आढावा देण्यासह महाराष्ट्राच्या राजकारणावर चर्चा करण्यासाठी आज काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली.
काँग्रेस नेत्यांनी घेतली सोनिया गांधींची भेट; महाराष्ट्रात सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग
दिल्लीतील 10 जनपथ या सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी आज के.सी. वेणुगोपाल, अहमद पटेल, मुकुल वासनिक यांची सोनिया गोंधींसोबत बैठक पार पडली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासंबधी चर्चा केली.
हेही वाचा - मुख्यमंत्री निश्चितपणे शिवसेनेचा होणार - नवाब मलिक
दिल्लीतील 10 जनपथ या सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी आज के.सी. वेणुगोपाल, अहमद पटेल, मुकुल वासनिक यांची सोनिया गोंधींसोबत बैठक पार पडली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासंबधी चर्चा केली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार 17 नोव्हेंबरला दिल्लीत सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. या बैठकीत महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेबाबतचा निर्णय होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.