महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आयारामांमुळे सत्ताधारी पक्षातील अनेकजण आमच्या संपर्कात - वडेट्टीवार - काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी

भाजपकडून सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते पक्षात घेण्यासाठी साम-दाम-दंड-भेद याचा उपयोग केला जात आहे. त्यामुळे जे मूळ भाजप आणि सेनेचे लोक आहेत त्यातील अनेकजण आमच्या संपर्कात आहेत.

विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार

By

Published : Sep 9, 2019, 8:19 PM IST

मुंबई- राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादीच्या जागा वाटपाचा प्रश्न सुटल्यात जमा आहे. भाजप आणि सेनेतील ज्या लोकांना उमेदवारी मिळणार नाही, परंतु ते प्रभावी उमेदवार आहेत, ते आमच्या संपर्कात आहेत, असा दावा आज विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. त्यासाठीच आम्ही उमेदवारांची यादी जाहीर करण्यासाठी 'वेट अँड वॉच'ची भूमिका घेतली असल्याची माहिती त्यांनी आज दिली.

वडेट्टीवार यांच्या बंगल्यावर आज काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची जागा वाटपासाठीची बैठक सुरू असून त्यापूर्वी वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. ते म्हणाले की, राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या जागा वाटपाचा विषय हा जवळजवळ सुटल्यात जमा आहे. केवळ दहा- बारा ते पंधरा जागांवर थोडे अडले आहे. तोही विषय सुटेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी 120 प्रमाणे जागा देण्याचे निश्चित झाले आहे. त्याचप्रमाणे इतर पक्षांसोबत जागा वाटपाची आमची चर्चा झाली असून त्यात बीआरएसपी, प्रा. जोगेंद्र कवाडे यांचा पीआरपी, आणि रिपाइंच्या इतर गटांच्या काही पक्षांसोबत चर्चा झाली आहे. तर अनेकांनी आम्हाला जाहीर पाठिंबा दिला आहे.

विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार

राज्यात ज्या जागा आमच्या वाट्याला येणार आहेत, त्यावर चर्चा होणारच आहे. मात्र, आम्ही राज्यात उमेदवारांची जी यादी असेल त्यासाठी पुढे लांबणीवर जाणार आहे. सेना-भाजपातून जे लोक आमच्याकडे येतील त्यांच्यासाठी आम्हालासुद्धा 'वेट अँड वॉच'ची भूमिका स्वीकारावी लागेल. त्यातही यावेळच्या निवडणुका या मेरीटवर निवडणुका असणार आहेत. त्यामुळे उमेदवार निवड करणे त्या दृष्टीने आमची चाचपणी सुरू असल्याची माहितीही वडेट्टीवार यांनी दिली.

भाजपकडून सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते पक्षात घेण्यासाठी साम-दाम-दंड-भेद याचा उपयोग केला जात आहे. त्यामुळे जे मूळ भाजप आणि सेनेचे लोक आहेत त्यातील अनेकजण आमच्या संपर्कात आहेत. त्यांच्या संदर्भातील आम्ही विचार करू शकतो, त्यापैकी काही जणांनी आमच्याकडे उमेदवारी मागितली तर आम्हाला त्यासाठी सकारात्मक विचार करावा लागेल. त्यामुळे ही जागा वाटपाची चर्चा थोडे दिवस पुढे असल्याचेही वडेट्टीवार म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details