महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सुशांतसिंह प्रकरणाला वर्ष होऊनही तपासाबाबत सीबीआयचे मौन का - सचिन सावंत - सुशांतसिंह राजपूत

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करत आहे. या प्रकरणाला एक वर्षे पूर्ण झाले असून, अद्याप सीबीआय कोणत्याच निर्णयापर्यंत पोहोचलेली नाही. एम्समधील डॉक्टरांच्या पॅनेलने सुशांतसिंहच्या हत्या झाली नसल्याचे सांगूनही 300 दिवस झाले आहेत. मात्र, सीबीआय या प्रकरणी अजूनही मौन बाळगून आहे. सीबीआयवर कोणाचा दबाव आहे का हे स्पष्ट करावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्त सचिन सावंत यांनी केली आहे.

सचिन सावंत
सचिन सावंत

By

Published : Aug 5, 2021, 6:43 PM IST

मुंबई -सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करत आहे. या प्रकरणाला एक वर्षे पूर्ण झाले असून, अद्याप सीबीआय कोणत्याच निर्णयापर्यंत पोहोचलेली नाही. एम्समधील डॉक्टरांच्या पॅनेलने सुशांतसिंहच्या हत्या झाली नसल्याचे सांगूनही 300 दिवस झाले आहेत. मात्र, सीबीआय या प्रकरणी अजूनही मौन बाळगून आहे. सीबीआयवर कोणाचा दबाव आहे का, चौकशीची काय सद्यस्थिती आहे, याबाबत सीबीआयकडून कोणतीच स्पष्टता दिली जात नाही. महाराष्ट्रातील तपास जाणीवपूर्वक अंतहीन ठेवण्याचे मोदी सरकारचे आदेश आहेत का, हे सीबीआयने स्पष्ट केले पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

सचिन सावंत यांचे ट्वीट

बिहार पोलिसांकडून सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूची चौकशी सीबीआयने हाती घेतली. याला एक वर्ष पूर्ण झाले आहे. सर्वोच्च न्यायालयानेही मुंबई पोलिसांच्या एकूण तपासाबद्दल समाधान व्यक्त केले होते. मात्र, मुंबई पोलिसांची प्रतिमा मालिन करण्याचा आणि महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा डाव होता. बिहारचे तत्कालीन पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांचा वापरही केला गेला. काही विरोधी पक्षाच्या नेत्यांनी अत्यंत खालच्या पातळीवर खुलेआमपणे खून, बलात्काराचे आरोप करण्यात आले. बिहार निवडणुकीच्या प्रचारातही सुशांतच्या मृत्यूचा मुद्दा वापरण्यात असल्याचे सचिन सावंत म्हणाले.

भाजपने माफी मागावी

महाविकास आघाडी सरकारवरील सुनियोजित राजकीय हल्ल्याची रणनिती आखली गेली. भाजप नेते महाराष्ट्राची बदनामी करत होते. सीबीआय आणि इतर एजन्सींनी बनावट माहिती लीक केली. भाजप आयटी सेलने हजारो बनावट ट्विटर, फेसबूक व यूट्यूब अकाउंट तयार केले व त्या माध्यमातून अपप्रचार केला. राष्ट्रीय तपास यंत्रणांनी सुशांतसिंहच्या मृत्यूच्या केलेल्या तपासाच्या चेष्टेतून मोदी सरकारकडून या यंत्रणांचा राजकीय अजेंड्यासाठी वापर केला असल्याचा गंभीर आरोप सावंत यांनी केला आहे. त्यामुळे महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या भाजपने माफी मागावी, अशीही मागणी सावंत यांनी केली आहे.

हेही वाचा -पोलिस अधिकाऱ्यांकडून सीबीआय अधिकाऱ्यांना धमकी

ABOUT THE AUTHOR

...view details