मुंबई - संभाजी ब्रिगेडचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांना पुण्यातून उमेदवारी दिली जाईल, असे बोलले जात असताना काँग्रेसने मोहन जोशींना उमेदवारी दिली. यावर प्रतिक्रिया देताना, काँग्रेस कोणताही निर्णय विचारपूर्वकच घेते, असे हुसेन दलवाई यांनी म्हटले आहे.
काँग्रेस विचार करुनच निर्णय घेते, पुण्यातील उमेदवारीवर हुसेन दलवाईंचा खुलासा - मोहन जोशी
काँग्रेस विचार करूनच निर्णय घेते, अशी प्रतिक्रिया हुसेन दलवाईंनी मुंबईत दिली. ते पुणे लोकसभेच्या उमेदवारीबाबत बोलत होते.
पुण्याच्या उमेदवारीबाबत दलवाईंना प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणाले, मी जोशींना मागील अनेक वर्षांपासून ओळखतो. ते चांगले कार्य करत आहेत. मतदारसंघात त्यांच्या ओळखीचे अनेक कार्यकर्ते आहेत. त्यामुळेच पक्षाने त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेताना पक्षाने कोणतीही चूक केली नाही, असा खुलासाही त्यांनी केला.
काँग्रेसने चंद्रपूर येथील उमेदवार का बदलला? ती चूक नव्हती का, असा सवाल केला असता दलवाई म्हणाले, त्या-त्या परिस्थितीत निर्णय चुकला असेल तर तो बदलला जातो. त्याच माध्यमातून चंद्रपूरचा निर्णय हा बदलण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.