महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 27, 2019, 9:26 AM IST

ETV Bharat / state

तिन्ही पक्षांचा समान कार्यक्रम ठरला; आता एकोप्याने काम करणार - अशोक चव्हाण

तिन्ही पक्षांचा किमान समान कार्यक्रम ठरला असून सर्व जण एकोप्याने काम करणार असल्याचा विश्वास काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. आज (बुधवारी) नवनिर्वाचीत विधानसभा सदस्यांचा शपथविधी कार्यक्रम विधानभवनात पार पडला. या आगोदर त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना मत व्यक्त केले.

CONGRESS LEADER ashok chavan
अशोक चव्हाण

मुंबई -तिन्ही पक्षांचा किमान समान कार्यक्रम ठरला असून सर्व जण एकोप्याने काम करणार असल्याचा विश्वास काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. आज (बुधवारी) नवनिर्वाचीत विधानसभा सदस्यांचा शपथविधी कार्यक्रम विधानभवनात पार पडला. या आगोदर त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना मत व्यक्त केले.

काँग्रेस नेते अशोक चव्हण यांची प्रतिक्रिया

हेही वाचा - अजित पवारांची चूक माफ करुन त्यांना पक्षात घ्यावे, छगन भुजबळांनी व्यक्त केली इच्छा

देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा अनुभवी नेत्याने प्रलोभनांना बळी न पडता विचारपूर्वक निर्णय घेतले असते तर त्यांच्यावर 72 तासांमध्ये राजीनामा देण्याची वेळ आली नसती. सत्तेच्या लालसेपोटी त्यांनी हा डाव खेळला असल्याचे चव्हाण यावेळी म्हणाले. आघाडीमध्ये अजिबात तणाव नव्हता आणि नाही. अजित पवार यांच्यामुळे काही प्रश्न निर्माण झाले होते. परंतु, आता ते संपले असल्याचे चव्हाण यावेळी म्हणाले. उपमुख्यमंत्री कुणाला करायचे ते मुख्यमंत्री ठरवणार असल्याचे अशोक चव्हाण यावेळी म्हणाले.

हेही वाचा - केवळ फडणवीसच नाहीत, तर 'हे' आहेत देशभरातील 'औटघटके'चे ठरलेले मुख्यमंत्री

ABOUT THE AUTHOR

...view details