महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Balasaheb Thorat Resigns : बाळासाहेब थोरात यांची नाराजी दूर होणार? दिल्लीतून हालचाली सरू... - कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळातील नेते पदाचा राजीनामा दिला आहे. बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिल्यामुळे कॉंग्रेसमधील पक्षांतर्गत वाद विकोपाला गेला आहे. बाळासाहेबांनी वरिष्ठांकडे तक्रार केल्यानंतर दिल्लीतील ज्येष्ठ नेत्यांनी काँग्रेस महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांच्यासोबत फोनवरून चर्चा केल्याचे सांगितले जात आहे.

Balasaheb Thorat Resigns
बाळासाहेब थोरात

By

Published : Feb 8, 2023, 4:44 PM IST

Updated : Feb 8, 2023, 7:45 PM IST

मुंबई : काँग्रेस नेते आणि कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यामधील वाद विकोपाला गेला आहे. या वादामुळे बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळातील नेते पदाचा राजीनामा दिला आहे. सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरून या वादाला सुरूवात झाल्याचे सांगितले जात आहे. कॉंग्रेसमधील या वादावरून बाळासाहेब थोरात राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमधील पक्षांतर्गत कलह समोर आला.

दिल्लीतून हालचाली सुरू : बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिल्यानंतर थेट दिल्लीतील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांकडे नाना पटोले यांची तक्रार केली आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. याबाबत काँग्रेस महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांच्यासोबत फोनवरून दिल्लीतील ज्येष्ठ नेत्यांनी चर्चा केल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधिमंडळ पक्ष नेते म्हणून बाळासाहेब थोरात यांनीच काम पहावे. थोरातांनी पक्षनेतेपदाचा दिलेला राजीनामा मागे घ्यावा, असे प्रयत्न दिल्लीतून केले जात असल्याचे सांगतिले जात आहेत.


एच के पाटील घेणार भेट : बाळासाहेब थोरात यांनी पक्षांतर्गत होणाऱ्या राजकारणाला कंटाळून विधिमंडळ नेते पदाचा राजीनामा दिला. मात्र, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी अशा प्रकारे दिलेला राजीनामा काँग्रेस पक्षश्रेष्ठींना रुचलेला नाही. बाळासाहेब थोरात यांनी हा राजीनामा मागे घ्यावा, यासाठी दिल्लीतील काँग्रेसच्या नेते मंडळींकडून प्रयत्न केले जात आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. सी. वेणुगोपाल यांनी एच. के. पाटील यांच्यासोबत चर्चा केली. दिल्लीतील पक्षश्रेष्ठी आणि ज्येष्ठ नेते के. सी. वेणुगोपाल लवकरच एस. के. पाटील यांच्यासोबत चर्चा करून येणाऱ्या पुढील दोन दिवसात एच. के. पाटलांना बाळासाहेब थोरात यांची मनधरणी करण्यासाठी मुंबईत पाठवणार आहेत.

वाद मिटवण्याचा प्रयत्न :गेल्या काही वर्षांपासून देशासह महाराष्ट्रात काँग्रेसची चांगलीच पडझड झाली आहे. त्यातच सत्तेतून महाविकास आघाडीला खाली खेचण्यास भारतीय जनता पक्षाला यश आले आहे. काँग्रेस पक्षाच्या दोन ज्येष्ठ नेत्यांमध्ये अशा परिस्थितीत असलेला कलह हा जनमानसात गेलेला चांगला संदेश नाही. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद मिटावा यासाठी दिल्लीत चर्चा केल्यानंतर एच के पाटील प्रयत्न करणार असल्याची माहिती आहे. दोन्ही नेत्यांनी आपापसातले मतभेद विसरून होऊ घातलेल्या निवडणुका आणि पक्षांतर्गत काम एकत्रितपणे करावे, यासाठी दिल्लीतून पक्षश्रेष्ठींची हालचाली सुरू झाल्या आहेत.

हेही वाचा :Chandrasekhar Bawankule : साल 2024 पर्यंत मोठ्या प्रमाणात होणार पक्षप्रवेश; महाविकास आघाडीला मिळणार नाही उमेदवार : चंद्रशेखर बावनकुळे

Last Updated : Feb 8, 2023, 7:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details