महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

माजी पंतप्रधान राजीव गांधींना प्रदेश काँग्रेसची आदरांजली - mumbai

प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने राजीव गांधी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

माजी पंतप्रधान राजीव गांधींना प्रदेश काँग्रेसची आदरांजली

By

Published : May 21, 2019, 5:08 PM IST

मुंबई -माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयात दादर (टिळक भवन) येथे प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

माजी पंतप्रधान राजीव गांधींना प्रदेश काँग्रेसची आदरांजली

यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी काँग्रेसचे प्रदेश कोषाध्यक्ष सुरेश शेट्टी, आमदार डी. पी. सावंत, माजी आमदार सुभाष चव्हाण, सरचिटणीस राजन भोसले यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details