मुंबई -अखिल भारतीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे रविवारी राज्याच्या दौऱ्यावर येत आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच राहुल गांधी यांची सत्ताधारी सरकारविरोधात तोफ धडाडणार आहे. राहुल यांच्या एकाच दिवशी तीन प्रचार सभा होणार आहेत. यामध्ये सकाळी लातूर येथे एक, तर दुपारनंतर मुंबईत दोन प्रचार सभा होणार आहेत.
राहुल गांधींच्या प्रचार तोफा रविवारी धडाडणार; लातूरमध्ये १, तर मुंबईत २ सभा - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९
गेल्या काही दिवसांपासून विरोधकांनी राहुल गांधी हे निवडणुकीच्या काळात इटलीला पळून गेले, अशा प्रकारचे टीकास्त्र त्यांच्यावर सोडले होते. मात्र, विरोधकांना तोंडघशी पाडत ते रविवारी राज्यात सभा घेणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून विरोधकांनी राहुल गांधी हे निवडणुकीच्या काळात इटलीला पळून गेले, अशा प्रकारचे टीकास्त्र त्यांच्यावर सोडले होते. मात्र, विरोधकांना तोंडघशी पाडत ते रविवारी राज्यात सभा घेणार आहेत. औसा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार व प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस बसवराज पाटील यांच्यासाठी राहुल गांधी हे रविवारी दुपारी औसा येथे सभा घेणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता चांदीवली विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे असलेले काँग्रेस नेते नसीम खान यांच्या मतदारसंघात राहुल गांधी सभा घेणार आहेत. या दिवसातील शेवटची सभा धारावी येथे वर्षा गायकवाड यांच्या मतदारसंघात होणार आहे.
रविवार तीन ठिकाणी घेण्यात येत असलेल्या निवडणूक प्रचार सभांमध्ये राहुल गांधी हे सत्ताधारी पक्षांकडून केलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या टीकांचा समाचार घेणार असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीतील मुद्द्यांवर विरोधक जाणीवपूर्वक दुर्लक्ष कसे करत आहेत? त्याविषयीचा मोठा खुलासा करून राज्य सरकारवर तोफ डागली जाणार असल्याचेही बोलले जात आहे.