महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कामगारमंत्री संभाजी पाटील यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करा-काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

पीक विम्याचे पैसै न मिळाल्याने नाराज मतदारांनी निवडणूकीवर बहिष्कार टाकला होता. तेव्हा संभाजी पाटील निलंगेकर यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदारांशी बोलून पीकविम्याचे पैसे देतो असे आश्वासन दिले.

कामगारमंत्री संभाजी पाटील यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करा-काँग्रेस

By

Published : Apr 20, 2019, 2:35 PM IST

मुंबई- लातूर मतदारसंघात मतदान सुरू असताना भाजपचे उमेदवार सुधाकर शृंगारे व कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केला आहे. त्यामुळे भाजप उमेदवार सुधाकर शृंगारे यांची उमेदवारी रद्द करावी आणि संभाजी पाटील यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभिजीत सपकाळ यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे.

कामगारमंत्री संभाजी पाटील यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करा-काँग्रेस

भाजपचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांनी एका मतदान केंद्राबाहेर मोबाईलच्या स्पीकर फोनवरून संभाजी पाटील निलंगेकर यांच्याशी बोलताना पीक विम्याचे पैसे मिळाले नसल्याने मतदार मतदान करत नाहीत असे सांगितले. तेव्हा संभाजी पाटील निलंगेकर यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदारांशी बोलून पीकविम्याचे पैसे देतो असे आश्वासन दिले. मतदान सुरू असताना अशा पद्धतीने मतदारांना प्रलोभन देणे हा आचारसंहिता भंगाचा प्रकार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने संभाजी पाटील निलंगेकर व उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्यावर आयोगाने तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी सपकाळ यांनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details