मुंबई - घाटकोपर पश्चिम मतदारसंघात राम कदम गेल्या 2 टर्मपासून आमदार आहेत. यावेळी त्यांना हरवण्यासाठी विरोधकही सज्ज झाले आहेत. कदम यांच्या विरोधात काँग्रेस यावेळी युवा उमेदवार वैभव धनावडे यांना रिंगणात उरवणार असून त्यांचे नाव निश्चित समजले जात आहे. एनएसयुआय ते युवक काँग्रेस असा प्रवास त्यांनी केला आहे. सध्या धनावडे युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी कार्यरत आहेत. धनावडे यांनी भेटीगाठी सुद्धा सुरू केल्या आहेत.
राम कदम यांच्या विरोधात काँग्रेसचे मराठी कार्ड - maharashtra assembly election 2019
घाटकोपर पश्चिम मतदारसंघातील संख्याबळ विचारात घेतले तर या विभागात मराठी मतदार जास्त आहेत. दोन लाख 82 हजार मतदार असलेल्या या मतदार संघात तब्बल दीड लाख मराठी मतदार आहेत. त्याबरोबरच 2009 आणि 2014 च्या विधानसभांचा विचार केल्यास काँग्रेसने दोन्ही वेळा या मतदारसंघात अभाषिक उमेदवार दिला होता.
घाटकोपर पश्चिम मतदारसंघातील संख्याबळ विचारात घेतले तर या विभागात मराठी मतदार जास्त आहेत. दोन लाख 82 हजार मतदार असलेल्या या मतदार संघात तब्बल दीड लाख मराठी मतदार आहेत. त्याबरोबरच 2009 आणि 2014 च्या विधानसभांचा विचार केल्यास काँग्रेसने दोन्ही वेळा या मतदारसंघात अभाषिक उमेदवार दिला होता. 2009 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी असताना जेनेट डिसोझा यांनी 30,360 मते घेतली होती, तर 2014 मध्ये रामगोपाळ यादव यांना 10 हजार 71 मतदान झाले होते. काँग्रेसचा धनावडे यांना उमेदवारी देत मराठी मतदारांना साद घालण्याचा प्रयत्न असेल. काँग्रेसचे या भागातील संघटना पाहता त्याला मरगळ आल्याचे चित्र आहे. मरगळ झटकून प्रचार केल्यास कदम यांना जोरदार टक्कर देऊ शकतात. कारण, शिवसेना आणि भाजपमध्ये कदम यांच्या विरोधात असलेली अंतर्गत नाराजी काँग्रेस आणि मनसे यांनी येथे उमेदवार दिल्यास त्यांच्या पथ्यावर उतरू शकते.
घाटकोपर पश्चिम विधानसभा भागात झोपडपट्टी मोठ्या प्रमाणात असून डोंगराळ भाग मोठा आहे. मात्र, या भागातील विकास कामे करण्यात मात्र कदम कमी पडले आहेत. कदम यांनी लोकांना तीर्थ यात्रेला नेणे, लहान मुलांना हेलिकॉप्टरमध्ये फिरवणे, हेल्मेट वाटणे ही कामे केली, जी एका आमदाराची नाहीत. आपल्या मतदारसंघात विकासकामे, नवीन प्रकल्प राबिवणे या कामांचा त्यांना विसर पडला. प्रजा फाऊंडेशनने अहवालात त्यांना सर्वात कमी क्रमांक दिला आहे. महिलांबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्या कदम यांना मतदानाच्या माध्यमातून नक्कीच धडा शिकवणार असून आरोग्य, शिक्षण, विकासकामे, एस. आर. ए. प्रकल्प या विषयांवर आपण निवडणूक लढवणार आहोत, असे धनावडे यांनी सांगितले आहे.