मुंबई - महापालिकेच्या केईएम रुग्णालयात ईसीजी मशीनमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागून तीन महिन्याच्या प्रिन्सचा हात, छाती आणि चेहऱ्याचा भाग जळाला. त्यामुळे त्याचा हात कापण्यात आला आहे. प्रिन्सला केईएम रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे दिव्यांग व्हावे लागले. आता त्याच्या दिव्यांगाची जबाबदारी मुंबई महापालिका प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापौर, पालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांकडे केली आहे.
जखमी प्रिन्सची जबाबदारी मुंबई महापालिकेने घ्यावी; काँग्रेसची मागणी - जखमी प्रिन्सची जबाबदारी मुंबई महापालिकेने घ्यावी
केईएम रुग्णालायात जखमी झालेल्या प्रिन्सचा हात कापण्यात आला. त्यानंतर काँग्रेसचे नगरसेवक अश्रफ आझमी, बब्बू खान, सुफियान वणू यांनी आज केईएम रुग्णलयाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी प्रिन्सच्या प्रकृतीची माहिती घेऊन त्याच्या वडिलांना घेऊन रुग्णालयाचे डीन डॉ. देशमुख यांचीही भेट घेतली. या भेटीनंतर पालिका मुख्यालयात महापौर, पालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांची भेट घेतली.
हृदयावर कमी खर्चात शस्त्रक्रिया होईल या आशेने उत्तरप्रदेशच्या महू जिल्ह्यातील कबिराजपुरमध्ये राहणारे पन्नेलाल राजभर हे आपल्या तीन महिन्यांच्या बाळाला घेऊन केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. पण, गेल्या बुधवारी त्याला लावण्यात आलेल्या व्हेंटिलेटर मशीनच्या वायर्समध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. त्यात हे बाळ भाजलं गेलं असून डावा हात आणि एका बाजूचा चेहरा भाजला आहे. पण, काहीही चूक नसताना त्यांच्या चिमुकल्या प्रिन्सला डावा हात गमवावा लागला. याबाबत स्थायी समितीत पडसाद उमटल्यावर काँग्रेसचे नगरसेवक अश्रफ आझमी, बब्बू खान, सुफियान वणू यांनी आज केईएम रुग्णलयाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी प्रिन्सच्या प्रकृतीची माहिती घेऊन त्याच्या वडिलांना घेऊन रुग्णालयाचे डीन डॉ. देशमुख यांचीही भेट घेतली. या भेटीनंतर पालिका मुख्यालयात महापौर, पालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांची भेट घेतली.
या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना, प्रिन्स २० ते २२ टक्के जळाला आहे. त्यामुळे हाताला गॅंगरिंग होऊन त्याचा एक हात कापावा लागला. आज आम्ही काँग्रेसच्या नगरसेवकांनी केईएमला जाऊन त्या मुलाची भेट घेतली, त्याच्या पालकांची भेट घेतली. त्याच्या वडिलांना डीन कडे घेऊन गेलो. त्याच्या हृदयाला छेद आहे. त्याची स्वास घेण्याची नळी छोटी झाली आहे. त्याला निमोनिया झाला आहे. यामुळे तो आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर आहे. तो गरीब घरातून आहे. त्याच्या उपचाराचा खर्च त्याचे कुटुंबीय उचलू शकत नाहीत. त्यामुळे जो काही उपचाराचा खर्च होईल तो महापालिकेने उचलावा. त्याच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी. एखादा काही अपघात किंवा मृत्यू झाल्यास त्यासाठी किती रक्कम द्यावी, याबाबत पालिकेने नुकसान भरपाई देण्यासाठी एक पॉलिसी बनवावी, अशी मागणी काँग्रेसच्या अश्रफ आझमी यांनी केल्याचे सांगितले. जर प्रिन्सच्या कुटूंबीयांना नुकसान भरपाई दिली नाही तर काँग्रेसकडून मोठे आंदोलन केले जाईल, असा इशारा अश्रफ आझमी, सुफियान वणू व बाबू खान या नगरसेवकांनी दिला आहे.