मुंबई -दुतोंड्या साप अनेकांनी पाहिला असेल, मात्र दुतोंड्या वाघ पाहण्याचं भाग्य संपूर्ण महाराष्ट्राला शिवसेनेमुळे लाभलं असल्याचे म्हणत काँग्रेसने शिवसेनेला खोचक टोला लगावला. शिवसेनेने काढलेल्या विमा कंपन्यांच्या विरोधातील मोर्च्यावरुनही काँग्रेसने सेनेला लक्ष्य केले. ज्या विमा कंपन्याविरोधात मोर्चा काढला त्यातीलच एका कंपनीकडून शिवसेना पालिका कर्मचाऱ्यांचा विमा उतरवत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
दुतोंड्या वाघ पाहण्याचं भाग्य शिवसेनेमुळे महाराष्ट्राला लाभलं - काँग्रेस - vima
दुतोंड्या साप अनेकांनी पाहिला असेल, मात्र दुतोंड्या वाघ पाहण्याचं भाग्य संपूर्ण महाराष्ट्राला शिवसेनेमुळे लाभलं असल्याचे म्हणत काँग्रेसने शिवसेनेला खोचक टोला लगावला.
![दुतोंड्या वाघ पाहण्याचं भाग्य शिवसेनेमुळे महाराष्ट्राला लाभलं - काँग्रेस](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3909510-thumbnail-3x2-congg.jpg)
काँग्रेसचा शिवसेनेवर निशाणा
शिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेवरुन काँग्रेसने सेनेवर निशाणा साधला. कधी हा वाघ सत्तेत असतो तर कधी विरोधात, कधी स्वबळाची भाषा करतो तर कधी युतीची, कधी स्वाभिमानी असतो तर कधी लाचार. त्यामुळे झाले 'बहु होतील बहु, परंतु या दुतोंड्या सम हाच!' असे काँग्रेसने म्हटले आहे. जर खासगी विमा कंपन्याचे खिसेच भरायचे तर हा मोर्चाचा दिखावा कशासाठी असेही काँग्रेसने म्हटले आहे.