मुंबई- विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी एकीकडे राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा दबाव असतानाही काँग्रेस आपला दुसरा उमेदवार मागे घेण्याच्या तयारीत नाही. महाविकास आघाडीचे 6 उमेदवार असून त्यांना निवडून आणण्याचे नियोजन करत असल्याचे महसूलमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांनीही शनिवारी थोरात यांनी भेट घेतली होती. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना संपर्क साधल्याची माहिती मिळत आहे. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनीही काँग्रेसने ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सहकार्य करावे, असे म्हटले आहे.