महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईकरांवर मालमत्ता करवाढीचा बोजा, काॅंग्रेस अन् भाजपाचा विराेध - मुंबई काँग्रेस बातमी

मुंबई महापालिका दर पाच वर्षांनी मालमत्ता करात वाढ करते. 2020 मध्ये मालमत्ता करात वाढ करणे अपेक्षित होते. मात्र, कोरोनाची परिस्थिती लक्षात घेत ही दरवाढ एका वर्षासाठी रोखली होती. यंदा करवाढीबाबत पुन्हा प्रस्ताव आणला जाणार आहे. पण, मालमत्ता कराचा प्रस्ताव आल्यास त्याला विरोध करू, अशी भूमिका भाजपा आणि काँग्रेसने घेतली आहे.

महापालिका
महापालिका

By

Published : Jun 16, 2021, 10:32 PM IST

Updated : Jun 16, 2021, 10:44 PM IST

मुंबई- मुंबईत मालमत्ता असलेल्या मालमत्ताधारकांकडून मुंबई महापालिका कर वसूल करते. दर पाच वर्षांनी मालमत्ता करात वाढ केली जाते. 2020 मध्ये मालमत्ता करात वाढ करणे अपेक्षित होते. मात्र, कोरोनाची परिस्थिती लक्षात घेत ही दरवाढ एका वर्षासाठी रोखली होती. मात्र, याबाबतचा प्रस्ताव पुन्हा स्थायी समितीसमोर आणला जाणार आहे. मालमत्ता कराचा प्रस्ताव आल्यास त्याला विरोध करू, अशी भूमिका भाजपा आणि काँग्रेसने घेतली आहे. तर प्रस्ताव आल्यावर चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊ अशी भूमिका सत्ताधारी शिवसेनेने घेतली आहे.

बोलताना विरोधी पक्ष नेते

मालमत्ता करात होणार वाढ

मुंबईत प्रत्येक पाच वर्षांनी मालमत्ता करात वाढ केली जाते. सन 2015 मध्ये मालमत्ता कर वाढवण्यात आला होता. त्यानंतर 2020 मध्ये वाढ अपेक्षित होती. मात्र, करोनाच्या संकटामुळे करवाढीचा निर्णय लांबणीवर पडला होता. आता पुढील चार वर्षासाठी 2025 पर्यंत पालिकेने मालमत्ता करवाढीचा निर्णय घेतला आहे. मात्र, विरोधी पक्षाने विरोध केल्यामुळे हा प्रस्ताव पुढील बैठकीपर्यंत स्थगित ठेवण्यात आला आहे. मालमत्ता कर वाढ जमीन किंवा इमारतीच्या भांडवली मूल्यावर एक एप्रिल, 2021 रोजी अंमलात असलेल्या रेडीरेकनर दरावर आधारित असणार आहे. म्हणजे मुंबईतील त्या त्या भागातील रेडीरेकनर दरानुसार कर निश्चित करण्यात येणार आहे. मात्र, या करवाढीला आता विराेधी पक्षांनी विराेध केला आहे.

कारवाढीला काँग्रेसचा विरोध

सध्या मुंबईत काेराेनाची परिस्थिती आहे. नागरिकांकडे पैसे नाहीत. गेले वर्षभर मुंबईत काेराेनाची प्रसार वाढला आहे. काेराेनाची दुसरी लाट आहे. पुन्हा तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांवर ही करवाढ लादू नये, अशी काॅंग्रेसची भूमिका आहे. हा करवाढीचा प्रस्ताव आल्यास काॅंग्रेस त्याला विराेध करेल. या एकवर्षात मालमत्ता करात वाढ झालेली नाही. आणखी एक वर्ष वाढ झाली तरी काेणताही फरक पडणार नाही. त्याबाबत आपण मुख्यमंत्र्यांना आणि पालिका आयुक्तांना पत्र लिहीणार असल्याची माहिती पालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी दिली.

तर रस्त्यावर उतरू, भाजपचा इशारा

बिल्डर आणि व्यावसायिकांना करात सुट दिली जाते. सामान्य नागरिकांना मात्र सुट दिली जात नाही. यापूर्वी वाढ केली त्यावेळी आम्ही सत्ताधार्यांच्या साेबत हाेताे. त्यासाठी पाठिंबा दिला हाेता. मात्र, आता काेराेनाची अपवादात्मक परिस्थिती आहे. त्यामुळे मालमत्ता करात वाढ करू नये. वाढ केल्यास आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा भाजपचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी दिला आहे.

योग्य निर्णय घेऊ

महापालिका प्रशासनाने मालमत्ता कर वाढीचा प्रस्ताव अद्याप स्थायी समितीसमोर आणलेला नाही. मालमत्ता करवाढीचा प्रस्ताव आल्यास त्यावर स्थायी समितीत चर्चा करून याेग्य ताे निर्णय घेतला जाईल, अशी माहिती समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली.

हेही वाचा -कोविड लस घेणाऱ्यासाठी खुशखबर.. लस घेणाऱ्यांना लोकल प्रवासास परवानगी

Last Updated : Jun 16, 2021, 10:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details