मुंबई - पेट्रोल व डिझेलचे भाव (petrol diesel price hike) गगणाला भिडले आहेत. यावरून काँग्रेसने (congress) आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबईसह महाराष्ट्रभर काँग्रेसने इंधन दरवाढीच्या विरोधात आंदोलने केली. बोरिवलीत काँग्रेसने मोर्चा काढला. मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात आणली बैलगाडी
आज (2 जून) बोरिवली येथे मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने पेट्रोल व डिझेल दरवाढ विरोधात आंदोलन करण्यात आले. त्या मोर्चात प्रथम बैलगाडी आणण्याचे ठरवले होते. परंतु मुक्या प्राण्यांना नाहक त्रास नको म्हणून बैलगाडीच्या जागी फक्त त्यांनी गाडी आणली. या आंदोलनावेळी काँग्रेस पक्षातर्फे मोठ्या प्रमाणावर केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
'मोदी सरकार कामगार, शेतकरी, सामान्यांच्या विरोधातील'