मुंबई- काँग्रेसच्या वतीने देशात उद्भवलेल्या आर्थिक मंदी व महागाईच्या विरोधात आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात आले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस सत्ताधारी पक्ष भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपने गेल्या 5 वर्षात काय केले? हा प्रश्न विचारत देशात उद्भभवलेल्या मंदी व महागाई विरोधात गळ्यात भाजीपाला घालून कार्यकर्त्यांनी निषेध केला.
हेही वाचा - ऑईल टँकरमधील पेट्रोल चोरून पाणी भरणाऱ्या ३ आरोपींना पोलिसांनी केले गजाआड
भारताचा जीडीपी आज 5 टक्केवर येऊन पोहोचला आहे. देश भयंकर आर्थिक मंदीतून जात आहे. महागाई सर्व स्तरांवर वाढतच चालली आहे. पेट्रोल डिझेलचे दर दिवसाला वाढतच चाललेले आहेत. महागाईमुळे गरीबांना 2 वेळेचे अन्न नीट मिळत नाही. भाज्यांचे, धान्यांचे दर वाढलेले आहेत, असे असतानासुद्धा मुख्यमंत्री आगामी निवडणुकांच्या प्रचारामध्ये मशगुल आहेत. यात्रा काढत आहेत. त्यांना गरिबाला होणाऱ्या त्रासाचे काही पडलेले नाही, असा आरोप काँग्रस कार्यकर्त्यांनी केला.
हेही वाचा -'चांद जमीन पर', मुंबईच्या रस्त्यांवर आरजे मलिष्काचं नवं गाणं एकदा पाहाच!