मुंबई- कोरोनाच्या प्रसारामुळे राज्य सरकारने राज्यात १४ एप्रिलपासून लॉकडाऊन लावला आहे. रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याने सरकारने लॉकडाऊन टप्प्याटप्पयाने उठवण्याचा निणर्य घेतला आहे. सरकराने जाहीर केल्यानुसार पॉझिटिव्हिटी रेटप्रमाणे मुंबई तिसऱ्या तर बेडच्या संख्येनुसार पहिल्या टप्यात आहे. मुंबई पहिल्या की तिसऱ्या टप्प्यात अशी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. पॉझिटिव्हिटी रेटप्रमाणे मुंबई तिसऱ्या टप्यात असल्याने मुंबईमध्ये काही निर्बंधांसह व्यवहार सुरु राहणार आहेत. तर सामान्य प्रवाशांना लोकल ट्रेनमधून प्रवासाची मुभा नसणार आहे.
maharashtra unlock मुंबईत संभ्रमावस्था, नवीन रुग्णसंख्या कमी, ऑक्सिजन बेडची संख्या जास्त - मुंबई कोरोना लेटेस्ट न्यूज
बईतील लोकल सेवा ही केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठी सुरू राहणार आहे. त्यामुळे मुंबईतली लोकलमधून सामान्य प्रवाशांना प्रवासाची मुभा दिली जाणार नाही. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा तपासला जाईल आणि त्यानुसार त्या जिल्ह्याला त्या त्या लेव्हलनुसार सूट दिली जाणार आहे.
मुंबईबाबत संभ्रमावस्था
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर राज्य सरकारने लॉकडाऊन घोषित केला. मात्र, आता राज्यात अनेक ठिकाणी पॉझिटिव्हीटी रेट कमी होत असल्याने राज्य सरकारकडून अनलॉक करण्यास पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. "मिशन बिगिन अगेन"अंतर्गत राज्यातील निर्बंधासाठी स्तर निश्चित करण्यात आले आहेत. याबाबत राज्य सरकारकडून आदेश काढण्यात आला आहे. याबाबत तीन जूनला आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घोषणा केली होती. मात्र, हा निर्णय विचाराधीन असल्याचे सांगत राज्य सरकारकडून त्यांच्या घोषणेला बगल देण्यात आली. यानंतर 4 जूनला रात्री उशिरा अधिसूचना काढत राज्य सरकारने सोमवारपासून राज्यात अनलॉकची घोषणा केली आहे. राज्यात पाच स्थरात लॉकडाऊन उठवला जाणार आहे. त्यानुसार मुंबईत ७ जूनपासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे. मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट ५.२५ टक्के तर मुंबईमधील १२.५१ टक्के ऑक्सिजन बेड्स भरलेले आहेत. या आकडेवारीचा विचार केल्यास मुंबई पॉझिटिव्हिटी रेटनुसार तिसऱ्या तर ऑक्सिजन बेडच्या आकडेवारीनुसार पहिल्या टप्प्यात आहे. राज्य सरकराने केलेल्या नियमावलीची अंमलबजावणी करण्याचे अधिकार मुंबई महापालिकेला दिले आहेत. यामुळे मुंबई महापालिकेचे अन लॉकडाऊनबाबतचे परिपत्रक आल्यावर नेमके काय सुरु राहणार आणि काय बंद राहणार हे स्पष्ट होणार आहे.
काय सुरु, काय बंद
सर्व दुकाने सायंकाळी चार वाजेपर्यंत खुली राहण्यास मुभा आहे. मॉल, थिएटर, नाट्यगृह बंद असतील. मैदाने आणि बगीचे सकाळी पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत खुली ठेवण्यात येतील. महत्त्वाची खाजगी कार्यालय चार वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. तर शासकीय कार्यालय 50% उपस्थितीत सुरू राहण्यास मुभा आहे. लग्नासाठी केवळ पन्नास लोकांच्या उपस्थितीतची परवानगी देण्यात आली आहे. अंत्यविधीसाठी 20 लोकांना परवानगी दिली आहे. महत्त्वाच्या मिटिंगसाठी 50% उपस्थिती, केवळ बांधकाम स्थळी काम करणाऱ्या मजूर आणि कर्मचाऱ्यांना मुभा असेल. शेतीविषयक कामे चार वाजेपर्यंत करण्यास मुभा असेल. सायंकाळी पाच वाजेपर्यंत जमावबंदी असेल तर पाच वाजेच्यानंतर संचारबंदी लागू होणार आहे. जिम, सलून आणि ब्युटी पार्लर सायंकाळी चार वाजेपर्यंत केवळ 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू राहील. सार्वजनिक वाहतूक आसन क्षमतानुसार सुरू राहतील.
सामान्य प्रवाशांना लोकल ट्रेन प्रवास नाही
मुंबईतील लोकल सेवा ही केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठी सुरू राहणार आहे. त्यामुळे मुंबईतली लोकलमधून सामान्य प्रवाशांना प्रवासाची मुभा दिली जाणार नाही. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा तपासला जाईल आणि त्यानुसार त्या जिल्ह्याला त्या त्या लेव्हलनुसार सूट दिली जाणार आहे. त्यामुळे येणारा काळात मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट झपाट्याने कमी झाला तर नक्कीच मुंबईकरांना लोकल सेवा खुली केली जाईल, असे आश्वासन विजय वडेट्टीवार यांच्याकडून देण्यात आले आहे.
.
कशा असणार आहेत स्तर (लेव्हल) ?
पहिला स्तर - जिल्ह्यात पॉझिटिव्हीटी रेट पाच टक्के पेक्षा कमी. तसेच ऑक्सिजन बेड 25 टक्क्यांपेक्षा कमी भरलेले
दुसरा स्तर - जिल्ह्यात पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के, ऑक्सिजन बेड्स 25 ते 40 टक्क्यांदरम्यान भरलेले
तिसरा स्तर - जिल्ह्यात पॉझिटिव्हीटी रेट 5 ते 10 टक्के असावा. ऑक्सिजन बेड्स हे 40 टक्क्यांपेक्षा जास्त भरलेले
चौथा स्तर - जिल्ह्यात पॉझिटिव्हीटी रेट 10 ते 20 टक्के एवढा. तसेच ऑक्सिजनचे बेड 60 टक्क्यांच्या वर भरलेले
पाचवा स्तर - जिल्ह्यात पॉझिटिव्हीटी रेट 20 टक्क्यांच्या वर आणि ऑक्सिजन बेड हे 75 टक्क्यांपेक्षा जास्त भरलेले