महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

CAA, NRC विरोधात असहकार करणार - कॉ. सीताराम येचुरी

केंद्र सरकारने CAA, NRC आणि NPR च्या माध्यमातून एक दहशतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. समाजात दुहीची बीजे पेरली जात आहेत. यामुळे CAA, NRC आणि NPR ला विरोध ही आमच्या अस्तित्वाची लढाई आहे. 'मोदी-शाह सावधान, हम बचायेंगे संविधान' चा नारा देत माजी खासदार व भाकप नेते कॉ. सीताराम येचुरी यांनी आम्ही CAA, NRC आणि NPR विरोधात असहकार करणार असल्याचा इशारा दिला.

कॉम्रेड सीताराम येचूरी
कॉम्रेड सीताराम येचूरी

By

Published : Feb 3, 2020, 1:37 AM IST

मुंबई- केंद्र सरकारने CAA, NRC आणि NPR च्या माध्यमातून एक दहशतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. समाजात दुहीची बीजे पेरली जात आहेत. यामुळे CAA, NRC आणि NPR ला विरोध ही आमच्या अस्तित्वाची लढाई आहे. 'मोदी-शाह सावधान, हम बचायेंगे संविधान' चा नारा देत माजी खासदार व भाकप नेते कॉ. सीताराम येचुरी यांनी आम्ही CAA, NRC आणि NPR विरोधात असहकार करणार असल्याचा इशारा दिला.

कॉम्रेड सीताराम येचूरी

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सुरू असलेल्या 'मुंबई कलेक्टिव' या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे, कॉ. सुधीर ढवळे आदी नेते उपस्थित होते.

मोदी सरकारकडून CAA, NRC आणि NPR च्या माध्यमातून देशातील बहुसंख्यांकाना देशाबाहेर घालवण्याचे षड्यंत्र केले जात आहे. ते उधळून लावण्यासाठी 'मोदी-शाह सावधान, हम बचायेंगे संविधान' हा नारा दिला. तसेच CAA, NRC आणि NPR विरोधात 'कागज नही दिखायेंगे' आणि 'हम जवाब नही देंगे' असा पवित्रा घेण्याचे आवाहन कॉ. येचुरी यांनी केले.

केंद्राच्या CAA, NRC आणि NPR यांचा घटनाक्रम आणि त्यातील तरतुदी, कार्यवाही समजून घेतली तर आपला पुरोगामी देश संपवला जाणार आहे. हिंदू, मुस्लिमांच्या नावाखाली हा देश तोडण्याचे कारस्थान केले जात आहे. आमचा भारत हा हिंदू-मुस्लिमांच्या अतूट नात्यांनी जुळला आहे. मात्र, त्याला हे लोक तोडण्याचे काम करत आहेत. ही बाब देशातील सर्वसामान्यांना कळली आहे. म्हणून मोदी- शाह यांचे कारस्थान उधळून लावण्यासाठी आता कोणत्या राजकीय पक्षाची गरज नाही. देशाला वाचवण्यासाठी तरुण आणि महिला पुढे आल्या आहेत, तेच देशाला वाचवतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

मुस्लीम लिग, हिंदु महासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या तीन संघटना स्वातंत्र्यपुर्वकाळापासून देशाचे दुश्मन राहिलेल्या आहेत. असा आरोप अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष कॉम्रेड अशोक ढवळे यांनी केला. नरेंद्र मोदी, अमित शाह आणि मोहन भागवत आहेत, ही खरी देशातील टुकडे टुकडे गँग आहे, असेही ढवळे म्हणाले.

दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनीही मोदी-शाह यांच्यावर हल्ला चढवला. देशातील ढासळलेल्या अर्थव्यवस्थेकडे लक्ष जाऊ नये, म्हणून CAA, NRC आणि NPR चा प्लॅन असल्याची शक्यता वर्तवली.

ABOUT THE AUTHOR

...view details