मुंबई - मालाड पश्चिमेकडील राठोडी व्हिलेज परिसरात एका घराची संरक्षक भिंत कोसळल्याची घटना आज सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मालाडमध्ये संरक्षक भिंत कोसळली, जीवितहानी नाही - Mumbai
मालाडमध्ये भिंत कोसळल्याच्या घटनेत कोणीही जखमी नाही. घटनेनंतर पोलीस,अग्निशमन दल व पालिकेचे अधिकारी यांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी केली. भिंत कोसळलेल्या ठिकाणचे डेब्रिज उचलण्याचं काम सुरू आहे.
![मालाडमध्ये संरक्षक भिंत कोसळली, जीवितहानी नाही](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3761701-514-3761701-1562394777065.jpg)
संरक्षक भिंत
संरक्षक भिंत
सकाळपासून सुरू असणाऱ्या पावसात आज राठोडी व्हिलेजच्या बोर्गेस हाऊस भोवती असलेली भिंत कोसळली. कोसळलेल्या संरक्षक भिंतीचे बांधकाम विटांचे होते.
या घटनेनंतर पोलीस, अग्निशमन दल आणि पालिकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मुसळधार पावसामुळे सोमवारी मालाड पिंपरी पाडा येथील पालिकेच्या जलाशयाची संरक्षक भिंत कोसळून २७ जणांचा मृत्यू झाला होता.