मुंबई :शिसेनेचे माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांनी लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप शिवसेनेच्या एका युवतीने केला होता. मात्र आता या आरोपापासून युवतीने माघार घेतली आहे. अँटॉप हिल पोलीस ठाण्यामध्ये दाखल केलेली तक्रार मागे घेत असल्याचे प्रतिज्ञापत्र तिने दाखल केले आहे. त्यामुळे मंगेश सातमकर यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
बलात्कार केल्याचा आरोप : युवतीने तिच्या प्रतिज्ञापत्र म्हटले आहे की, "मंगेश सातमकर हे शिवसेनेचे प्रभावशाली नगरसेवक असून त्यांचा अँटॉप हिल परिसरामध्ये दबदबा आहे. शिवसेनेची कार्यकर्ती असलेली तरुणी प्रमुख म्हणून काम करत होती. तेव्हा सातमकर या तरुणीला लोणावळ्यात घेऊन गेले. तिथे तिच्यासोबत शरीर संबंध ठेवले असल्याची तक्रार त्या युवतीने अँटॉप हिल पोलीस ठाणे येथे केली होती. या प्रकरणाचा मुंबई सत्र न्यायालयामध्ये खटला सुरू आहे. त्या खटल्यामध्ये या युतीने बळजबरीने लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ऑगस्ट महिन्यामध्ये होणार होती.