मुंबई- १६ जुलै रोजी शहरातील डोंगरी परिसरातील तांडेल लेनवरील केसरबाई, ही चार मजली इमारत कोसळली होती. या भयानक दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला होता. तर, ९ जण जखमी झाले होते. या घटनेला कारणीभूत असणाऱ्या लोकांवर डोंगरी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
डोंगरी इमारत दुर्घटने प्रकरणी ठेकेदार व इमारत ट्रस्टवर गुन्हा दाखल - गुन्हा नोंदविण्यात आला
केसरबाई इमारत दुर्घटनेच्या बाबतीत झालेल्या प्राथमिक चौकशीत, ही इमारत अनधिकृत असल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबतीत पोलिसांनी ठेकेदार व इमारत ट्रस्टवर गुन्हा नोंदविला आहे.
प्रतिकात्मक छायाचित्र
केसरबाई इमारत दुर्घटनेच्या बाबतीत झालेल्या प्राथमिक चौकशीत, ही इमारत अनधिकृत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटनेला दोषी असणाऱ्यांवर डोंगरी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. इमारतीचे अनधिकृत बांधकाम करणारा ठेकेदार व इमारतीची मालकी असणाऱ्या ट्रस्टच्या विरोधात कलम ३०४ (अ), ३३८, ३३७, ३४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.