महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सुशांतच्या बहिणींविरुद्ध रियाने दिलेली तक्रार योग्यच...; मुंबई पोलिसांचा न्यायालयात दावा - रिया चक्रवर्ती न्यूज

रिया चक्रवर्तीच्या तक्रारीवरून नोंदवण्यात आलेला गुन्हा हा कायद्याला धरून आहे. गुन्हा नोंदवणारा अधिकारी हा कायद्याला बांधिल असल्याचे मुंबई पोलिसांनी उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये म्हटले आहे.

Complaint against Sushant's sisters revealed offence: Police to HC
सुशांत प्रकरण : रियाने दिलेली तक्रार योग्य...; मुंबई पोलिसांचे उच्च न्यायालयात उत्तर

By

Published : Nov 3, 2020, 11:54 AM IST

Updated : Nov 3, 2020, 12:04 PM IST

मुंबई - सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सुशांतची बहीण प्रियंका व मितू सिंह यांच्याविरोधात रिया चक्रवर्ती हिने मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केल्यानंतर यासंदर्भात गुन्हा नोंदवून तो सीबीआयकडे मुंबई पोलिसांनी वर्ग केला होता. मात्र, याच्याविरोधात सुशांतसिंहच्या दोन्ही बहिणींकडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये गुन्हा रद्द करावा, म्हणून याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी सध्या सुरू आहे. मुंबई पोलिसांकडून दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये वांद्रे पोलीस ठाण्यामध्ये रिया चक्रवर्तीच्या तक्रारीवरून नोंदवण्यात आलेला गुन्हा हा कायद्याला धरून असून 154 सीआरपीसीच्या अंतर्गत हा गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. गुन्हा नोंदवणारा अधिकारी हा कायद्याला बांधिल असल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे.

गुन्हा नोंदवण्यास सीबीआयचा विरोध
या अगोदर मुंबई उच्च न्यायालयामध्ये सीबीआयकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले होते. यामध्ये सीबीआयने हा गुन्हा कायद्याच्या चौकटीत बसत नसल्याचे म्हटले होते. सुशांतसिंह मृत्यू प्रकरणी सध्या सीबीआय तपास करीत असून हा तपास सुरू असताना पुन्हा एकदा नव्याने गुन्हा नोंदविणे हे कायद्याच्या दृष्टिकोनातून चुकीचे असल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे. रिया चक्रवर्ती हिने सुशांतसिंहच्या मृत्यूच्या 90 दिवसांनंतर तक्रार दाखल केलेली आहे, जी चुकीची असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

काय म्हटले होते रियाने तक्रारीत -
एनडीपीएसकडून बंदी घालण्यात आलेली औषधे, प्रियंका सिंह व मितू सिंह यांच्याकडून जबरदस्तीने सुशांतसिंहला घेण्यास भाग पाडण्यात आले असल्याची तक्रार रिया चक्रवर्ती हिने वांद्रे पोलिसांकडे केली होती. दिल्लीतील डॉक्टर तरुण कुमार आणि इतर व्यक्तींच्या माध्यमातून मेडिकल प्रिस्क्रिप्शन व्हॉट्सअपवर देऊन सुशांतसिंहला सदरची औषध ही देण्यास भाग पाडले जात असल्याचे रियाने तिच्या तक्रारीत म्हटले आहे. रिया चक्रवर्तीचा तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदवून तो पुढील तपासासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयकडे वर्ग केला होता.

Last Updated : Nov 3, 2020, 12:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details