मुंबई: याबाबत काही महिन्यांपूर्वी समीर वानखेडे यांनी 'नॅशनल कमिशन ऑफ शेड्युल कास्ट'कडे ज्ञानेश्वर सिंह यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. तसेच त्यांच्या विरोधात एट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी गोरेगाव पोलीस ठाण्यात केली होती. माझ्या तक्रारीत जे साक्षीदार आहेत, त्यांच्या घरावर छापे टाकून दबाव आणण्याचा प्रयत्न होत आहे. त्याचप्रमाणे समीर वानखेडे आणि ज्ञानेश्वर सिंह यांच्यातील कॉर्डिंलिया क्रुज कारवाई दरम्यान झालेल्या व्हाट्सअप चॅटची देखील माहिती समोर आली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मान्यतेने घडले : 'एनसीबी'चे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आणि 'एनसीबी'चे डीडीजी ज्ञानेश्वर सिंह यांच्यात झालेल्या व्हॉटसअप चॅटमध्ये कोणाला अटक करण्यात आली, कोणती प्रेस रिलीज झाली, ती कोणी प्रसिद्ध केली, कोर्टाचा सीन काय आहे, अशा सगळ्या गोष्टी ज्ञानेश्वर सिंह समीर वानखेडे यांना विचारतात. आपल्या याचिकेत दिलेल्या या व्हॉट्सअॅप चॅट्समध्ये समीर वानखेडे यांनी दक्षता प्रमुख (व्हिजिलन्स हेड) ज्ञानेश्वर सिंह आणि डीजी यांच्यावर आरोप केले होते. ड्रग्ज प्रकरणात केली गेलेली अटक ही वरिष्ठांच्या मान्यतेने झाल्याचे याचिकेत समीर वानखेडे यांनी नमूद केले आहे.
ज्ञानेश्वर सिंहला क्षणाक्षणाचे अपडेट:हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत समीर वानखेडे यांनी आर्यन खानच्या अटकेबाबत समीर वानखेडे आणि ज्ञानेश्वर सिंग यांच्यात झालेल्या व्हॉट्सअॅप चॅटची संपूर्ण माहितीही दिली आहे. या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये ज्ञानेश्वर सिंग वानखेडे यांना प्रत्येक लहान-मोठ्या प्रकरणाची माहिती विचारत आहेत. या चॅट्सवरून उघड झाले की, कोणाला अटक करण्यात आली. मीडियामध्ये काय सांगितले गेले, फोटो आणि व्हिडिओ पाठवा, आर्यनचा सेल्फी कोणी घेतला, तो एनसीबी अधिकारी आहे का, ज्ञानेश्वर सिंह समीर वानखेडे यांच्याकडून अशी सर्व माहिती घेत होते.
वानखेडे यांच्याशी भेदभाव: राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग (NCSC) ला 17 ऑक्टोबरला समीर वानखेडे यांची तक्रार प्राप्त झाली आहे. आयोगाने या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. समीर वानखेडे यांनी आयोगाच्या अध्यक्षांची देखील भेट घेतली आहे. या प्रकरणावर वानखेडे यांनी तपशीलवार चर्चा केली आहे. वानखेडे यांच्याशी भेदभाव छळ होत असल्याचे आयोगाचे निरीक्षण आहे. त्यामुळे प्रकरण प्रलंबित असेपर्यंत पुढील कारवाई करू नये असे आयोगाने म्हटले होते. त्याचप्रमाणे समीर वानखेडे यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात देखील ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत ज्ञानेश्वर सिंह यांच्या विरोधात लिखित तक्रार दाखल केली होती. ही तक्रार देखील गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात दाखल करण्यात आली आहे.
हेही वाचा:
- Karnataka Gov Formation : कोणाची लागणार मंत्रिमंडळात वर्णी; सिद्धरामय्या, डीके शिवकुमार आज दिल्लीत घेणार पक्षश्रेष्ठींची भेट
- Cordilea Cruise drug cases : समीर वानखेडेकडून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल, आज दुपारी होणार सुनावणी
- Chhatrapati Sambhajinagar Crime News: मुलीची हत्या करून दाम्पत्याने केली आत्महत्या; कारण मात्र अस्पष्ट