महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Kirit Somaiya : वर्षभरापूर्वीच किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात तक्रार, पोलिसांवर दबाव असल्यामुळे कारवाई नाही - किरीट सोमय्या - no action due to pressure on police

आज भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन, किशोरी पेडणेकर यांच्यावर आरोप केले आहेत. एसआरए प्रकल्पात घोटाळा प्रकरणात एक वर्षापूर्वी किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात तक्रार (Complaint against Kishori Pednekar year ago) करण्यात आली होती. मात्र पोलिसांवर दबाव असल्यामुळे कारवाई केल्या गेली नसल्याचे (no action due to pressure on police) सोमय्या म्हणाले.

Kirit Somaiya
पेडणेकर यांच्या विरोधात तक्रार

By

Published : Oct 30, 2022, 7:08 PM IST

मुंबई : मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ कमी होताना दिसत नाही. आज भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन, किशोरी पेडणेकर यांच्यावर आरोप केले आहेत. एसआरए प्रकल्पात घोटाळा प्रकरणात एक वर्षापूर्वी किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात तक्रार करण्यात (Complaint against Kishori Pednekar year ago) आली होती. मात्र पोलिसांवर दबाव असल्यामुळे कारवाई केल्या गेली नसल्याचे (no action due to pressure on police) सोमय्या म्हणाले.

गाळे लाटण्याचा आरोप : मात्र राज्यामध्ये उद्धव ठाकरे यांचे त्यावेळी सरकार असल्याकारणाने त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती, असा आरोप पत्रकार परिषदेतून यांनी लावला आहे. एस आर एचे अनेक प्रकरणांमध्ये किशोरी पेडणेकर यांनी घोटाळे केले आहेत. याबाबत किरीट सोमय्या यांनी तक्रार दाखल केली होती. याबाबतचे काही कागदपत्र देखील किरीट सोमय्या यांनी दादर पोलीस स्टेशनमध्ये अधिकाऱ्यांकडे दिले आहेत. या प्रकरणात किशोरी पेडणेकर यांना पोलिसांकडून समंस देण्यात आला असल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे. गोमाता नगर एस आर ए प्रकल्पात किशोरी पेडणेकर यांनी गाळे लाटण्याचा आरोप यांच्याकडून करण्यात आला आहे.



किरीट सोमय्या यांचे आरोप खोटे :एस आर ए प्रकरणात किरीट सोमय्या आपलं नाव बदनाम करत आहेत. या सर्व प्रकरणात किंवा यांनी लावलेले आरोप खोटे असून, आपल्याला बदनाम करण्याचं हे एक षडयंत्र आहे. आज पत्रकार परिषद घेऊन यांनी जे आरोप लावलेले आहेत, याची उत्तरे आपण आधीच दिली आहेत. घोटाळ्या बाबत आपल्यावर जे आरोप लावले जात आहेत. त्यापैकी एकही गाळा किंवा घर आपल्या नावावर नाही. आपल्यावर केवळ खोटे आरोप लावले जात असल्याचे स्पष्टीकरण किशोरी पेडणेकर यांच्याकडून ट्विटच्या माध्यमातून देण्यात आला आहे.

किशोरी पेडणेकरांनी केलेले ट्विट

ABOUT THE AUTHOR

...view details