मुंबई : धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज उर्फ बागेश्वर महाराज यांनी शिर्डीतील साईबाबा यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने ते अडचणीत सापडले आहेत. बागेश्वर शास्त्रींविरोधात मुंबईच्या वांद्रे पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली गेली आहे. युवा सेना नेते राहुल कनाल यांनी ही तक्रार दाखल केली आहे.
राहुल कनाल यांची तक्रार : मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील वांद्रे पोलिस ठाण्यात यासंबंधी लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवा सेनेचे पदाधिकारी आणि शिर्डी साई संस्थानचे माजी विश्वस्त राहुल कनाल ही तक्रार यांनी केली आहे. बागेश्वर बाबा यांनी शिर्डीच्या साईबाबांविरोधात केलेले वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी ही तक्रार दिली आहे. बागेश्वर बाबांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी युवासेनेने केली आहे. तसेच बागेश्वर बाबा हे साई भक्तांच्या भावनांशी खेळत आहेत, असे युवासेनेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
'साईबाब देव असू शकत नाहीत' : राहुल कानल यांनी आपल्या तक्रारीत धीरेंद्र शास्त्री यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा देखील आरोप केला आहे. साईबाबा हे फकीर असू शकतात. त्यांना संत देखील म्हणता येईल, पण ते देव असू शकत नाही, असे ते म्हणाले आहेत. ते म्हणाले की, आपल्या धर्मात शंकराचार्यांना सर्वात मोठे स्थान आहे. मात्र त्यांनी साईबाबांना देवांचे स्थान दिलेले नाही. ते पुढे म्हणाले की, ज्यांची साईबाबांवर श्रद्धा आहे त्यांच्या श्रद्धेला मी दुखावू इच्छित नाही. मग ते कोणतेही संत असू द्या. गोस्वामी तुलसीदास किंवा सूरदास हे सर्व संतच आहेत. त्यांपैकी काही महापुरुष आहेत. काही युगपुरुष आहेत. तर काही कल्प पुरुष आहेत, परंतु यांच्यापैकी कोणीही देव नाही. या अगोदर देखील बागेश्वर महाराजांनी संत तुकाराम महाराजांविषयी वादग्रस्त विधान केले होते.
हे ही वाचा :Thackeray vs Shinde Group : उद्धव ठाकरे गटाच्या गर्भवती महिला कार्यकर्त्याला शिंदे गटाकडून मारहाण, आयसीयुमध्ये उपचार सुरू