मुंबई - जळगाव शहरातील एका वसतिगृहातील महिलेसोबत पोलिसांनी गैरप्रकार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील महिला वेडसर असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. या प्रकरणी सहा महिला वरिष्ठ अधिकाऱ्यांची कमिटी स्थापन करण्यात आली होती. या कमिटीने चौकशी दरम्यान वसतिगृहातील १७ महिला साक्षी नोंदवल्या. या कमिटीच्या अहवालात कोणतेही तथ्य नसल्याचे पुढे आले आहे, असेही देशमुख म्हणाले.
कोणताही पोलीस कर्मचारी हजर नव्हता -
तक्रारदार महिलेच्या नवऱ्याने ती वेडसर तक्रार याआधी दिली होती. तसेच २० फेब्रुवारी मनोरंजनासाठी गरबा, कवीता वाचन आदी कार्यक्रम घेण्यात आले होती. दरम्यान, तक्रारदार महिलेने लांब झगा घातला होता. त्या झग्याचा त्रास झाला तो तीने काढून ठेवला. यावेळी या वसतीगृहाचे रजिस्टर चेक केले असता यावेळी कोणताही पोलीस कर्मचारी हजर नसल्याचे स्पष्ट झाले आहे. व्हिडीओ काढला, नग्न व्हायला सांगितले या गोष्टीत तथ्य नसल्याचेही त्यांनी सांगितले.