मुंबई -न्यूयॉर्क ते दिल्ली हा आंतरराष्ट्रीय प्रवास करत असताना एका महिलेला शंकर मिश्रा ( Misbehavior with woman on plane ) या मुंबईत राहणाऱ्या व्यक्तीने दुष्कृत्य केले होते. मात्र, आता नवीन बाब समोर आलेली आहे. आरोपी शंकर मिश्रा याने त्याला आपल्या दुष्कृत्याची खंत वाटली म्हणून तक्रारदार महिलेला त्याने नुकसान भरपाई दिली होती असा दावा त्याच्या वकिलांनी केला आहे. मात्र घटना घडल्याच्या नंतर तब्बल सहा आठवड्यानंतर ही कारवाई डीजीसीए, एअर इंडिया यांनी केलेली आहे. त्यासंदर्भात डीजीसीए यांनी अंतर्गत समिती स्थापन चौकशी सुरू ( show cause notices to four cabin crew and one pilot ) केली असता त्यांच्यावर तीस दिवसाची विमान प्रवास बंदी घालण्यात आली आहे.
घटनेबाबत करणे दाखवा नोटीस -26 नोव्हेंबर 2022 रोजी न्यूयॉर्क ते दिल्लीला विमान येत असताना विमानामध्ये एका महिला प्रवाशावर दारू पिलेल्या अवस्थेत असताना शंकर मिश्राने लघवी केली होती. याबाबत विमान प्राधिकरणाने सुरुवातीला कोणतेही ठोस कारवाई न केल्यामुळे प्रकरण चर्चेत होते. अखेर नागरी हवाई विमान मंत्रालयाने याबाबत अंतर्गत समिती स्थापन चौकशी सुरू केली. तर, एअर इंडिया यांनी देखील अंतर्गत चौकशी करत एका पायलट, चार क्रू सदस्यांना या घटनेबाबत करणे दाखवा नोटीस ( Air India issues show cause notices ) दिली आहे.