मुंबई :नाशिकच्या निफाड येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची भेट देण्यासाठी राज्याचे माजी राज्यमंत्री बच्चू कडू काही दिवसापूर्वी भेट घेण्यासाठी गेले होते मात्र बच्चू कडू यांची गाडी रस्त्याच्या मध्ये अडवत एका वयोवृद्ध नागरिकाने बच्चू कडू यांना चांगलेच खडसावलं होतं. उद्धव ठाकरे यांच्यासोबत गद्दारी का केली? असा सवाल या वृद्ध व्यक्तीने बच्चू कडू यांना विचारला होता याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाल्यानंतर याबाबत अधिवेशनात आल्यानंतर बच्चू कडू यांनी स्पष्टीकरण दिला आहे. आपण कधीही सामान्य नागरिकांबरोबर गद्दारी केलेली नाही आपण पक्षासोबत गद्दारी करू शकतो. मात्र, राज्यातील सामान्य नागरिकांबरोबर गद्दारी करू शकत नाही असे विधानभवनात प्रसार माध्यमांशी संवाद साधताना बच्चू कडू म्हणाले आहेत.
उद्धव ठाकरे यांना सोडून का गेले? :उद्धव ठाकरे यांना सोडून का गेले? असा प्रश्न आपल्याला विचारण्यात येतो. मात्र उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्याकडे का गेले? ते राज्याच्या भल्यासाठी गेले होते का? मुख्यमंत्री पदासाठी गेले होते महाविकास आघाडीचे सरकार असताना अडीच वर्षे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्याचा काय भलं केलं? असा सवाल बच्चू कडू यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच कोविडमध्ये मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी उत्तम काम केलं. मात्र त्यातही त्यांनाआरोग्यमंत्री राजेश टोपे यांची साथ होती. उद्धव ठाकरे यांनी विचारा सोबत गद्दारी केली. मात्र मी सामान्य नागरिकांसाठी गद्दारी केलेली नाही मी गद्दार नाही असे स्पष्टीकरण बच्चू कडू यांनी यावेळी दिले. मला सामान्य माणसाने निवडून दिल आहे. माझी गद्दारी पक्षासोबत होऊ शकते मात्र सामान्य नागरिकांसोबत माझी गद्दारी होणार नाही. आपण सामान्य नागरिकांसाठी कधीही उपलब्ध असतो वयोवृद्ध, तरुण सर्व नागरिक कधीही आपल्याला भेटायला येतात.