महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठाच्या स्थापनेसाठी समिती स्थापन करावी' - uday samant news

मुंबई विद्यापीठाचे विभाजन करून रत्नागिरी येथे कोकण विभागासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्यासंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.

committee-should-be-set-up-to-independent-university-for-konkan
committee-should-be-set-up-to-independent-university-for-konkan

By

Published : Jan 11, 2020, 8:44 AM IST

मुंबई- पैठण येथे संत वारकरी विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठाचे विभाजन करून कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठाची स्थापन करावी यासाठी एक समिती स्थापन करावी, असे आदेश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल (शुक्रवारी) विधानभवनात झालेल्या बैठकीत दिले.

हेही वाचा-'मी येथे आलोय.. तुमच्या समोर आहे..पाहून घ्या'

मुंबई विद्यापीठाचे विभाजन करुन रत्नागिरी येथे कोकण विभागासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्यासंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीतच पैठण येथे संत विद्यापीठ स्थापन करण्यात यावे, यासाठीचाही विषय समोर आल्याने या दोन्ही विद्यापीठासाठी एक समिती स्थापन करण्याचे आदेश सामंत यांनी दिले.

कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि दक्षिण रायगड येथील महाविद्यालयांसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन केल्यास कोकणातील विद्यार्थ्यांना होणारा त्रास कमी होईल. मुंबई विद्यापीठावर येणारा प्रशासकीय भार कमी होईल. यासाठी हे विद्यापीठ स्थापन होणे आवश्यक आहे. कोकण विभाग हा समुद्र किनारपट्टी असलेला भाग आहे. त्यासाठी स्थानिकांच्या गरजा लक्षात घेऊन समुद्र विज्ञान, नारळ संशोधन, संशोधन प्रक्रिया, उद्योग, पर्यटन, व्यापारी जहाज वाहतूक असे व्यवसायिक अभ्यासक्रम तयार करावेत. त्यामुळे स्थानिकांना रोजगाराभिमुख शिक्षण घेता येईल. तर दुसरीकडे महाराष्ट्राला संत, महंत आणि वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा आहे. राज्यात पैठण येथे संत वारकरी विद्यापीठाची निर्मिती व्हावी, अशी अनेक वर्षापासूनची मागणी आहे. या विद्यापीठाच्या निर्मितीसाठी शासन सकारात्मक असून त्यासाठी एक समिती स्थापन करण्यात यावी. या समितीमध्ये शासकीय आणि वारकरी संप्रदायातील तज्ज्ञ मार्गदर्शक असलेल्या व्यक्तींचा समावेश असावा, असेही सामंत यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details