महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालिकेतील अधिकाऱ्यांवर आयुक्तांना भरोसा नाय का? - रवि राजा - आयुक्तांना भरोसा नाय का बातमी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकास प्रक्रिया आणि निर्णय प्रक्रियेचा अनुभव तरुणांना मिळावा, त्यातून समाजसेवा करण्यासाठी सुजाण नागरिक तयार व्हावेत यासाठी मुख्यमंत्र्यांनी फेलोशिप कार्यक्रम जाहीर केला. तशी तरुणांची नियुक्तीही करण्यात आली.

विरोधी पक्ष नेते रवी राजा

By

Published : Sep 18, 2019, 9:38 PM IST

मुंबई - मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाच्या धर्तीवर मुंबई महानगरपालिकेत खासगी फेलोशिप कार्यक्रम राबवला जात आहे. या खासगी फेलोशिपच्या नावाने १५ जणांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यांच्या माध्यमातून महापौर, स्थायी समिती अध्यक्ष व पालिका प्रशासनामधील बड्या अधिकाऱ्यांवर पालिका आयुक्त वॉच ठेवणार आहेत. याबाबतच्या प्रस्तावाला आज गटनेत्यांच्या सभेत मंजुरी देण्यात आली. खासगी फेलो उमेदवारांची नियुक्ती करण्याला विरोधी पक्षांनी विरोध केला असून आयुक्तांना आपल्या अधिकाऱ्यांवर भरोसा नाही का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

हेही वाचा-लै खास, मी काय म्हातारा झालोय का? पवारांची फटकेबाजी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकास प्रक्रिया आणि निर्णय प्रक्रियेचा अनुभव तरुणांना मिळावा, त्यातून समाजसेवा करण्यासाठी सुजाण नागरिक तयार व्हावेत यासाठी मुख्यमंत्र्यांनी फेलोशिप कार्यक्रम जाहीर केला. तशी तरुणांची नियुक्तीही करण्यात आली. त्याच धर्तीवर मुंबई महापालिकेत १५ फेलोशिप उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. या पदासाठी १११ जणांनी अर्ज केला होता. त्यामधून १५ जणांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना ७५ हजार ते १ लक्ष २५ हजार इतके मानधन दिले जाणार आहे. या उमेदवारांना पालिका उपायुक्त कार्यालय, सहाय्यक आयुक्त कार्यालयात नियुक्त केले जाणार आहे. तसेच महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षांच्या कार्यालयातही फेलोशीप उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे.

विरोधी पक्ष नेते रवी राजा

हेही वाचा-राणे 'वेटींग'वरच राहतील; गृहराज्यमंत्री दिपक केसरकरांचा टोला

महापालिकेच्या विविध विभागांमधील दैनंदिन कामकाज प्रक्रिया, कामकाजादरम्यान ताळमेळ साधणे, काम गतीमान होण्यासाठी पाठपुरावा करणे इत्यादीकरता या १५ फेलोशीप उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या फेलोशिपअंतर्गत कुठेही कामाचा १ वर्ष किंवा अधिक कालावधीचा अनुभव असलेल्या आणि एमबीए पदवीधर उमेदवारांची ११ महिन्यांसाठी निवड करण्यात आली आहे. हे फेलोशिप उमेदवार थेट पालिका आयुक्तांना रिपोर्टींग करणार आहेत. यामुळे पालिका अधिकाऱ्यांवर आयुक्त खासगी वॉच ठेवणार असल्याची चर्चा पालिका मुख्यालयात सुरू आहे.

आयुक्तांना भरोसा नाही का ?
मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत इंजिनियर, सहाय्यक आयुक्त (वॉर्ड ऑफिसर), उपायुक्त असे बडे अधिकारी आहेत. ज्यांच्या माध्यमातून पालिकेच्या विभाग कार्यालयाचे काम चालते. तसेच पालिकेच्या कामावर वॉच ठेवला जातो. मात्र, आता खासगी फेलो नियुक्त करुन या अधिकाऱ्यांवर पालिका आयुक्त वॉच ठेवणार आहेत. यावरुन पालिका आयुक्तांना आपल्या अधिकाऱ्यांवर भरोसा नाही असा आरोप विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केला आहे. फेलोशिपच्या नावाने पालिका आयुक्त खासगीकरण करत आहेत. हा प्रस्ताव मंजूर करता यावा म्हणून या १५ जणांमधील एकाची महापौर कार्यालयात तर एकाची स्थायी समिती अध्यक्षांच्या कार्यालयात नियुक्ती केली जाणार आहे. पालिकेच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांना ४० हजार रुपये पगार दिला जात असताना खासगी फेलोशिप उमेदवारांना मात्र सव्वा लाख रुपये मानधन दिले जाणार आहे. हे चुकीचे असल्याचे रवी राजा यांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details