महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रोच्या रूळ जोडणीला सुरूवात - मुंबई मेट्रो न्यूज

मेट्रो 3 प्रकल्पाअंतर्गत कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रोच्या 33.5 किमीच्या भुयारी मेट्रो मार्गाच्या भुयारीकरणाचे काम 87 टक्के पूर्ण झाले आहे. तर आजपासून मार्गावरील रूळ जोडणीचे काम सुरू करण्यात आले आहे.

Commencement of Colaba-Bandra-Seepz Metro line connection start from today
Commencement of Colaba-Bandra-Seepz Metro line connection start from today

By

Published : Oct 9, 2020, 9:17 PM IST

मुंबई - कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ मार्गाचे काम रोज कोणता ना कोणता टप्पा पूर्ण करत आहे. या प्रकल्पाच्या नव्या टप्प्याला सुरुवात करण्यात येत असून मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) कडून या मार्गावरील रूळ जोडणीचे काम सुरू करण्यात आले आहे. अमेरिकेतून आयात केलेल्या फ्लॅश बट वेल्डींग मशिनद्वारे हे काम करण्यात येत असून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ स्थानक येथून आजपासून या कामाची सुरुवात करण्यात आली आहे.

मेट्रो-3 प्रकल्पा अंतर्गत कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रोच्या 33.5 किमीच्या भुयारी मेट्रो मार्गाच्या भुयारीकरणाचे काम 87 टक्के पूर्ण झाले आहे. तर बांधकाम 60 टक्के पूर्ण झाले आहे. नुकताच मेट्रो 3 चा 32 वा ब्रेक थ्रू यशस्वीपणे पार पडला आहे. आता केवळ 9 ब्रेक थ्रू बाकी असून 100 टक्के भुयारीकरण लवकरच पूर्ण होणार आहे. तर आता दुसरीकडे आजपासून मेट्रो 3 च्या रूळ जोडणील सुरू झाली आहे. त्यानुसार आता रुळांच्या कामासाठी महत्त्वाच्या अशा फ्लॅश बट वेल्डिंग मशीनचा वापर करत हे काम करण्यात येणार आहे. तसेच या मार्गासाठी हेड हार्डन्ड रुळांच्या वापर होणार आहे. रुळ जोडणीसाठी दोन फ्लॅश बट वेल्डींग मशिनचा वापर करण्यात येणार आहे. यातील एक मशीन याआधीच मुंबईत दाखल झाले आहे. तर दुसरे मशीन नोव्हेंबरमध्ये मुंबईत दाखल होणार आहे. या मशीनद्वारे ३४० फ्लॅश व्होल्टेज आणि ४२० बुस्ट व्होल्टेजचा वापर करून अलाइनिंग, प्री-हिटिंग, फ्लॅशिंग, फॉर्जिंग, स्ट्रीपिंग आणि एअर-क्वेंचिंग या प्रक्रिया करून रुळांचे वेल्डींग करण्यात येणार आहे. हे मशीन अमेरिकेतील मे. हॉलंड एल.पी. या कंपानीद्वारे बनविण्यात आले आहे.

ही एक स्वयंचलित मशीन असून यात योग्य दर्जाचे वेल्डींग होण्यासाठी सर्व मापदंड आधीच निश्चित करण्यात आले आहेत. या ३३.५ किमी लांबीच्या मार्गिकेचे वेल्डिंग ११विविध ठिकाणांवरून करण्यात येणार असल्याची माहिती एमएमआरसीचे व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह दओल यांनी दिली आहे. दरम्यान मेट्रो-३ प्रकल्पासाठी एकुण १०, ७४० टन हेड हार्डन्ड रुळांची आवश्यकता असून अद्याप ८३६६ टन रूळ एमएमआरसीला मिळाले आहेत. तर उर्वरीत रूळ लवकरच जपानहून मुंबईत दाखल होणार आहेत. फ्लॅश बट वेल्डींग मशीनच्या साहाय्याने १८ मीटर लांबीच्या हेड हार्डन्ड रुळांचे वेल्डिंग करून अखंड रूळ तयार करण्यात येणार आहेत. यामुळे प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी प्रवास करता येणार असल्याचे एमआरसीचे प्रकल्प संचालक सुबोध कुमार गुप्ता यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details